पांडुरंग वामन काणे (Pandurang Waman Kane) यांचा जन्म ७ मे १८८० साली रत्नागिरी जिल्ह्यातील पुरोहित कुटुंबात झाला. त्यांचे वडील वामनराव काणे हे तालुक्याच्या ठिकाणी वकील होते. पांडुरंग वामन काणे यांनी आपलं मॅट्रिकपर्यंतचं शिक्षण दापोली येथे पूर्ण केलं. पांडुरंग वामन काणे हे एक भारतीय शिक्षणतज्ज्ञ, भारत संशोधक, वकील, इतिहासकार आणि संस्कृत भाषेचे विद्वान होते. १९६३ साली त्यांना भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘भारतरत्न’ देऊन सन्मानित करण्यात आलं होतं.
पांडुरंग वामन काणे (Pandurang Waman Kane) यांचा शैक्षणिक क्षेत्रात काम करण्याचा कार्यकाळ चार दशकांहून अधिक होता. आपल्या कारकिर्दीत त्यांनी १९४७ ते १९४९ सालादरम्यान मुंबई युनिव्हर्सिटीचे कुलगुरुचे पदही सांभाळले होते. पांडुरंग वामन काणे हे विशेषतः त्यांनी लिहिलेल्या ‘धर्मशास्त्राचा इतिहास’ नावाच्या पाच खंड असलेल्या ग्रंथासाठी ओळखले जातात. १९५३ ते १९६४ या सालादरम्यान पांडुरंग वामन काणे हे भारतीय संसदेतील वरीष्ठ सभागृहात राज्यसभेमध्ये त्यांचे नामांकन करण्यात आले होते.
(हेही वाचा Narayan Rane: जे अभ्यास करीत नाहीत, त्यांना पेपर कठीण जातो, नारायण राणेंनी माध्यमांशी साधला संवाद; म्हणाले…)
इतिहासकार राम शरण शर्मा म्हणतात की, ‘पांडुरंग वामन काणे हे समाजसुधारणेशी जोडले गेलेले एक महान संस्कृततज्ज्ञ आहेत. ‘धर्मशास्त्राचा इतिहास’ हा पाच खंडांचा ग्रंथ लिहिणे हे त्यांच्या सर्वोत्कृष्ट कार्यांपैकी एक आहे. प्राचीन भारतातील सामाजिक कायदे आणि रूढी-परंपरांचा ज्ञानकोश वाचल्यामुळे आपल्याला प्राचीन भारतीय सामाजिक जीवनाचा अभ्यास करण्यासाठी खूप मदत मिळते. पांडुरंग वामन काणे (Pandurang Waman Kane) यांनी सुरुवातीला संस्कृतचा अभ्यास केला होता. त्यानंतर त्यांनी कायद्याचा अभ्यास करून वकिलीची पदवी प्राप्त केली. मग ते मुंबई हायकोर्टात वकिलीची प्रॅक्टिस करू लागले. याव्यतिरिक्त त्यांनी विल्सन कॉलेज आणि एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये संस्कृत हा विषय शिकवला. तसेच गव्हर्नमेंटच्या लॉ कॉलेजमध्ये त्यांनी कायद्याचा अभ्यासही शिकवला. पांडुरंग वामन काणे हे बॉम्बे एशियाटिक सोसायटीचे सदस्यही होते.
Join Our WhatsApp Community