Baramati LS constituency : ‘एक व्होट की किमत तूम क्या जानो’

181
Baramati LS constituency : ‘एक व्होट की किमत तूम क्या जानो’
Baramati LS constituency : ‘एक व्होट की किमत तूम क्या जानो’

‘एक चुटकी सिंदूर की किमत तूम क्या जानो’ या फिल्मी संवादातून राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी प्रेरणा घेतलेली दिसते. फरक फक्त इतकाच आहे की ‘एक चुटकी सिंदूर’च्या जागी ‘एक व्होट’ म्हणजेच ‘मत’, ‘एक व्होट की किमत तूम क्या जानो’ असा प्रश्न पवारांनी बारामतीकरांना केला पण त्याचा परिणाम किती झाला, हे निवडणुकीनंतरच कळेल.

दहा वर्षानंतर पवारांचे मत बारामतीत

गेली जवळपास दहा वर्षे शरद पवार यांच्या घरचा पत्ता सिल्वर ओक बंगला, भुलाभाई देसाई रोड, मलबार हिल, मुंबई असा असून त्यांचे मुंबईतील मतदार यादीत नाव होते. गेल्या दहा वर्षात झालेल्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीत त्यांचे नाव मुंबईतील मतदार यादीत होते.

(हेही वाचा – BMC : अतिरिक्त आयुक्तांच्या ‘त्या’ कृतीची महापालिकेत चर्चा!)

पत्ता का बदलला?

पवारांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीसाठी मुंबईचा निवासी पत्ता बदलला होता. २००५ ते २००८ पर्यंत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे पवार अध्यक्ष होते तर २०१० ते २०१२ आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे प्रमुख आणि ऑक्टोबर २०१३ ते जानेवारी २०१७ पर्यंत मुंबई क्रिकेट असोसिएशनचे प्रमुख होते. (Baramati LS constituency)

अस्तित्वाचा प्रश्न

लोकसभा २०२४ मध्ये पवारकन्या सुप्रिया सुळे या निवडणूक रिंगणात आहेत आणि त्यांच्या समोर अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा आहेत. राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या फूटीनंतर पक्ष पुन्हा उभा करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असतांनाच लोकसभा निवडणूक लागली. निवडणूक आयोग तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने विधानसभा अध्यक्षांकडे झालेल्या सुनावणीत राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्ष आणि घडयाळ हे चिन्ह अजित पवार यांना गेल्याने शरद पवार अस्वस्थ झाले. आता लोकसभेला त्यांची कन्या सुप्रिया सुळे यांच्यासमोर सुनेत्रा यांना मैदानात उतरवून अजित पवार यांनी त्यांच्या अस्तित्वाला धोका निर्माण केला आहे. (Baramati LS constituency)

(हेही वाचा – PUNE: ईव्हीएम मशिनवर ‘कमळ’ चिन्ह दिसले नाही, आजोबांनी संतापाच्या भरात साधला थेट मतदान अधिकाऱ्यांशी संवाद; पहा Video)

पवार कुटुंबासोंबत मतदान

सुप्रिया यांच्या प्रचारासाठी पवारांनी सर्व प्रकारचे प्रयत्न केले. संपूर्ण पवार कुटुंब अजित पवार यांच्या विरोधात गेले असून एका-एका मतासाठी पवारांनी जुळवणी केली. यासाठी पवार यांनी त्यांचे स्वतःचे मतही मुंबईहून बारामतीला नेले. मुंबईतील मतदार यादीतून नाव कमी करून ते बारामतीच्या पत्त्यावर मतदार यादीत समाविष्ट करून घेतले आणि आज अख्ख्या पवार कुटुंबासोंबत मतदान केले. शरद पवार यांनी बारामतीत मतदान केल्याने बारामतीतील ज्येष्ठ नागरिकही मतदानात घेतल्याचे सांगण्यात आले. (Baramati LS constituency)

बारामतीत ६० टक्क्याहून अधिक मतदान

गेल्या तीन लोकसभा निवाडणुकांमध्ये म्हणजेच २००९ मध्ये ६२.८७ टक्के, २०१४ मध्ये ६८.६४ टक्के तर २०१९ च्या निवडणुकीत ६१.५३ टक्के मतदान बारामतीत झाले. आज मंगळवारी ७ मे ला होणाऱ्या निवडणुकीत किती मतदान होते याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. (Baramati LS constituency)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.