-
ऋजुता लुकतुके
राष्ट्रीय शेअर बाजाराचे संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आशीषकुमार चौहान यांनी सध्या तरी शेअर बाजाराच्या व्यवहारांच्या वेळा वाढणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. सेबीने शेअर बाजाराच्या प्रस्तावाला मंजुरी दिली नसल्याचं ते म्हणाले. गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यापासून शेअर बाजाराच्या कामकाजाच्या वेळा वाढवल्या जाऊ शकतात, अशी बातमी पसरली होती. शेअर बाजारांनी तसा प्रस्तावही ठेवला होता. (Share Market Timing)
तर इंडेक्स आणि फ्युचर बाजारासाठी वेळ वाढवून मिळावी, अशी मागणी नॅशनल एक्सचेंज मेंबर्स ऑफ इंडिया या संस्थेनंही केली होती. तशीच मागणी कॅश मार्केटमध्येही होती. त्यामुळे मग सेबीनेही राष्ट्रीय शेअर बाजाराच्या प्रस्तावावर चर्चा करण्याची तयारी दाखवली होती. राष्ट्रीय बाजाराने टप्प्या टप्प्याने वेळा वाढवण्याचा प्रस्ताव ठेवला होता. पहिल्या टप्प्यात फ्युचर, ऑप्शन आणि इंडेक्सचा बाजार संध्याकाळी ६ ते रात्री ९ या कालावधीत सुरु ठेवायचा होता. दुसऱ्या टप्प्यात इंडेक्स आणि फ्युचर, ऑप्शनचा बाजार रात्री साडे अकरापर्यंत सुरू राहणार होता. आणि तिसऱ्या टप्प्यात कॅश सेगमेंटही संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सुरू राहणार होते. (Share Market Timing)
(हेही वाचा – Arvind Kejriwal यांना दुहेरी झटका, सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा नाही, २० मेपर्यंत कोठडी)
सेबीने हा प्रस्ताव अभ्यासासाठी स्वीकारला होता. पण, शेअर बाजाराशी संबंधित सर्व यंत्रणांची मतं मागवण्यात आली तेव्हा काही शेअर बाजार दलांलांच्या असोसिएशननी या प्रस्तावाला विरोध केला. त्यामुळे एकवाक्यता दिसत नसल्याचा शेरा मारून सेबीने सध्या हा प्रस्तावच मागे टाकला आहे.
राष्ट्रीय शेअर बाजाराने अलीकडेच चौथ्या तिमाहीचे आपले निकाल जाहीर केले आहेत. शेअर बाजाराचा नफा गेल्यावर्षीच्या तुलनेत ३४ टक्क्यांनी वाढला आहे. आणि कंपनीने समभागधारकांना एका समभागावर ४ समभागांचा बोनस जाहीर केला आहे. तर एका समभागावर ९० रुपयांचा लाभांशही जाहीर केला आहे. (Share Market Timing)
हेही वाचा –
Join Our WhatsApp Community