लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून अल्पसंख्याक समाजातील एकाही उमेदवाराला तिकीट देण्यात न आल्याने काँग्रेसचे नेते नसीम खान यांनी स्टार प्रचारक पदाचा राजीनामा सोपवून तीव्र नाराजी व्यक्त केली होती. मात्र, आता नसीम खान यांची नाराजी दूर होऊन ते उत्तर मध्य मुंबईतील काँग्रेसचे उमेदवार वर्षा गायकवाड यांच्या प्रचारात सहभागी झाले असले तरी समजावादी पक्षानेही (Samajwadi Party) महाविकास आघाडीच्या उमेदवार वर्षा गायकवाड आणि अरविंद सावंत यांच्यासाठी कंबर कसली आहे.
समाजवादी पक्षाचे (Samajwadi Party) आमदार रईस शेख यांनी मंगळवारी अरविंद सावंत आणि गायकवाड यांच्यासाठी प्रचारात विविध ठिकाणी भाग घेतला. रईस शेख यांनी काँग्रेस आणि उबाठा शिवसेनेच्या उमेदवाराच्या प्रचारात भाग घेतल्याने भविष्यात सपामध्ये नाराज असलेले रईस शेख काँग्रेसमध्ये घरोबा करतील का अशा प्रकारचा सवाल केला जात आहे.
(हेही वाचा कसाबची बाजू घेणाऱ्यांना राज्यातून हद्दपार करा; PM Narendra Modi यांचे आवाहन)
वैयक्तिक बैठकांमध्येही ते सहभागी
काँग्रेस पक्षाचे माजी आमदार बाबा सिध्दीकी हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्यामुळे नसीम खान हे एकमेव मुस्लिम नेते मुंबईत आहेत. परंतु इंडी आघाडीचा भाग असलेल्या समाजवादी पक्षाचे पदाधिकारी महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचारात हिरीरीने भाग घेताना दिसत आहे. समाजवादी पक्षाचे (Samajwadi Party) भिवंडीतील आमदार रईस शेख यांनी मंगळवारी दक्षिण मुंबईतील उबाठा शिवसेनेचे उमेदवार अरविंद सावंत यांच्या प्रचार यात्रेत सहभागी झाले. सायंकाळी साडेचार ते सात वाजेपर्यंत या प्रचार यात्रेत सहभागी झाले होते. त्यानंतर रात्री आठ वाजता ते उत्तर मध्य मुंबईतील काँग्रेसच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांच्या प्रचारात सहभागी झाले. एमआयजी ते कुर्ला येथील प्रचार सभेत ते सहभागी झाले होते आणि त्यानंतर दहा वाजता कलिना येथील वैयक्तिक बैठकांमध्येही ते सहभागी होणार होते.
Join Our WhatsApp Community