Raver LS constituency: रावेरमध्ये चौथ्यांदा भगवा फडकणार

244
Raver LS constituency: रावेरमध्ये चौथ्यांदा भगवा फडकणार

जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदार संघ (Raver) हा भाजपाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या मतदार संघाची निर्मिती २००९ मध्ये झाली आणि तेव्हापासून झालेल्या तीन लोकसभा निवडणुकांत भाजपाचे निर्विवाद वर्चस्व या मतदार संघावर राहिले आहे. भाजपा (BJP) आता या मतदार संघावर चौथ्यांदा भगवा फडकावण्याच्या स्थितीत असल्याचे चित्र आहे. (Raver LS constituency)

रावेर मतदार संघातून महायुतीच्या उमेदवार रक्षा खडसे (Raksha khade) असून महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी कॉँग्रेस शरदचंद्र पवार (NCP) गटाचे श्रीराम पाटील यांना उमेदवारी मिळाली आहे. (Raver LS constituency)

महाजन, खडसे यांची पकड घट्ट

जळगाव जिल्ह्यात भाजपाचा बोलबाला इतका आहे की, गटबाजी करण्यासाठीही अन्य पक्षाचे नेतेही नाहीत. भाजपा नेते, ज्यांची ओळख फडणवीस सरकारच्या काळात ‘संकट मोचक’ अशी तयार झाली ते गिरीश महाजन (Girish Mahajan) आणि भाजपातून राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये जाऊन पुन्हा स्वगृही (भाजपा) परतण्याच्या  वाटेवर असलेले एकनाथ खडसे यांची घट्ट पकड या जिल्हयावर आहे. मात्र या दोन नेत्यांमधून विस्तव जात नाही, हे जगजाहीर आहे. (Raver LS constituency)

(हेही वाचा – इंडी आघाडीचा ‘मिशन कॅन्सल’ कार्यक्रम हाणून पाडा! – PM Narendra Modi यांचा कॉंग्रेसवर हल्लाबोल)

भाजपाचा रक्षा यांच्यावर विश्वास

खडसे यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांची सून, भाजपाच्या विद्यमान खासदार रक्षा खडसे यांची उमेदवारी कापली जाईल, अशी चर्चा जिल्ह्यात होत होती मात्र भाजपाने रक्षा यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना पुन्हा निवडणूक रिंगणात उतरवले. त्यानंतर रक्षा यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी कॉँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून एकनाथ खडसे यांना उमेदवारी देण्यात येईल आणि सून विरुद्ध सासरे अशी लढत होईल, असे वाटत असतानाच एकनाथ खडसे यांनी लोकसभा निवडणूक लढण्यास असमर्थता व्यक्त केली. (Raver LS constituency)

खडसे यांच्यामुळे बळ

एकसंघ राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर खडसे यांना विधान परिषदेवर आमदारकी मिळाली नाहीच, पण राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्येच उभी फूट पडली. शरद पवार यांच्या हातून पक्ष, चिन्ह गेल्याने खडसे यांचे अस्तित्व केवळ एका गटापुरते राहिले. अखेर त्यांनी थेट भाजपाच्या केंद्रीय नेत्यांशी संपर्क साधून स्वगृही परतण्याचा निर्णय घेतला. खडसे (Eknath Khadse) यांच्या भाजपात येण्याच्या निर्णयामुळे पक्षाला आणि स्थानिक उमेदवारला निश्चितच बळ मिळाले आहे.

(हेही वाचा – IPL 2024, Rohit Sharma : सलग चौथ्या खराब खेळीनंतर रोहित शर्मा डग आऊटमध्ये रडला का?)

सहापैकी चार विधानसभा भाजपाकडे

या लोकसभा मतदार संघात सहा विधानसभा क्षेत्र असून त्यात प्रत्येकी दोन जागांवर भाजपा, शिवसेना (शिंदे) आणि कॉँग्रेस असे आमदार आहेत. जामनेर मध्ये गिरीश महाजन तर भुसावळला संजय सावकारे हे भाजपाचे आमदार असून चोपडा आणि मुक्ताईनगर लता सोनवणे आणि चंद्रकांत पाटील हे शिवसेना (शिंदे) यांचे आमदार आणि रावेर व मलकापुर मतदार संघात शिरीष चौधरी आणि राजेश एकाडे हे विधानसभेत कॉँग्रेसचे प्रतिनिधित्व करतात. (Raver LS constituency)

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.