Girija Devi यांना ठुमरीची राणी का म्हणायचे?

बनारस घराण्यातल्या भारतीय शास्त्रीय संगीताच्या गायिका होत्या. तसेच क्लासिकल आणि सेमी क्लासिकल गाणी गायच्या

148
Girija Devi यांना ठुमरीची राणी का म्हणायचे?

गिरीजा देवी यांचा जन्म ८ मे १९२९ साली वाराणसी येथे झाला. त्यांचे वडील रामदेव राय (Ramdev Rai) हे मोठे जमीनदार होते. ते हार्मोनियम वाजवायचे आणि संगीतही शिकवायचे. गिरीजा देवी यांनी वयाच्या पाचव्या वर्षापासूनच संगीत शिकायला सुरुवात केली. तत्कालीन गायक आणि सारंगीवादक सरजू प्रसाद मिश्रा (Violinist Sarju Prasad Mishra) यांच्याकडे गिरीजा देवी गाण्याचे ख्याल आणि टप्पा हे प्रकार शिकल्या. नऊ वर्षांच्या असताना गिरीजा देवींनी ‘याद रहे’ नावाच्या चित्रपटात कामंही केलं होतं. त्यानंतर चांद मिश्रा यांच्याकडे त्यांनी गायनाच्या वेगवेगळ्या शैलींमध्ये अभ्यास करणं सुरू ठेवलं. (Girija Devi)

गिरीजा देवी या सेनिया आणि बनारस घराण्यातल्या भारतीय शास्त्रीय संगीताच्या गायिका होत्या. त्या क्लासिकल आणि सेमी क्लासिकल गाणी गायच्या. सेमी क्लासिकल प्रकारात मोडणाऱ्या ठुमरीला त्यांनी एका वेगळ्याच उच्च स्थानावर नेऊन ठेवले. ठुमरीचा दर्जा उंचावला. गिरीजा देवींना ‘ठुमरीची राणी (Queen of Thumri)’ असे म्हणूनही संबोधले जायचे.  (Girija Devi)

(हेही वाचा – Raver LS constituency: रावेरमध्ये चौथ्यांदा भगवा फडकणार)

गिरीजा देवी यांनी १९४९ साली ऑल इंडिया रेडिओ, अलाहाबाद येथे आपलं पाहिलं सादरीकरण केलं. पण त्यानंतर त्यांना त्यांच्या आजी आणि आईने गाण्यासाठी विरोध केला. कारण त्यांचं असं मत होतं की कोणत्याही उच्च घराण्यातील महिलेने असे सार्वजनिकपणे आपल्या कलेचं प्रदर्शन मांडू नये. त्यावेळी गिरीजा देवींनी कोणासाठीही खाजगी कार्यक्रम न करण्याचं ठरवलं आणि काही काळ सार्वजनिक स्तरावरही कार्यक्रम करणं बंद केलं. पण पुढे १९५१ साली त्यांनी बिहार येथे एका सार्वजनिक मैफिलीमध्ये आपलं पहिलं सादरीकरण केलं. (Girija Devi)

१९८० सालच्या दशकामध्ये गिरीजा देवी यांनी कलकत्ता येथील आयटीसी संगीत संशोधन अकॅडमीमध्ये संगीत शिकवलं. त्यानंतर १९९० सालच्या दशकातील सुरुवातीला त्यांनी बनारस हिंदू विद्यापीठ येथे त्यांनी फॅकल्टी मेंबर म्हणून काम सांभाळलं. त्यासोबतच त्यांनी तिथल्या विद्यार्थ्यांना संगीताचा वारसा जतन करून ठेवायला शिकवलं. साल २००९ पासून त्यांनी आपल्या संगीत दौऱ्याला सुरुवात केली ती शेवटपर्यंत सुरूच ठेवली. (Girija Devi)

(हेही वाचा – Samajwadi Party च्या आमदाराला काँग्रेस पक्ष खुणावतोय; प्रचारातही कसली कंबर)

त्या बनारस घराण्यातील गायिका होत्या. त्या पुरबी आंग, ठुमरी, चैती, होली आणि कजरी ही सेमी क्लासिकल प्रकारची गाणी गात होत्या. संगीतातल्या आपल्या योगदानासाठी गिरीजा देवींना पद्मश्री पुरस्कार, पद्मभूषण पुरस्कार, पद्मविभूषण पुरस्कार देऊन भारत सरकारने सन्मानित केले होते. त्याप्रमाणेच त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार, संगीत नाटक अकादमी फेलोशिप, महासंगीत सन्मान पुरस्कार, संगीत सन्मान पुरस्कार, गिमा पुरस्कार (जीवनगौरव) आणि तानारिरी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते.  (Girija Devi)

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.