Indian Armed Forces मधील भविष्यकालीन नेते घडवण्यासाठीच्या संरक्षण धोरणांवर बैठकीत चर्चा

164

एकात्मिक संरक्षण कर्मचारी विभागाच्या मुख्यालयाच्या अखत्यारीत पुणे येथील लष्करी तंत्रज्ञान संस्थेत (एमआयएलआयटी) 07 मे 2024 रोजी सहाव्या कमांडंट्स बैठकीचे आयोजन करण्यात आले. प्रतिष्ठित सशस्त्र दल प्रशिक्षण संस्था आणि युध्द विद्यालयांतील कमांडंट्ससह सशस्त्र दलांतील (Indian Armed Forces) इतर वरिष्ठ अधिकारी या बैठकीत उपस्थित होते. भारतीय सशस्त्र दलांतील (Indian Armed Forces) भविष्यकालीन नेते घडवण्यासाठी यापुढील काळात स्वीकारण्याच्या संरक्षण धोरणांचे मार्ग निश्चित करण्यासंदर्भात या बैठकीत सखोल विचारमंथन झाले.

भविष्यासाठी सुसज्ज सेनादलांच्या उभारणीसाठी धोरणांची आखणी

पुणे येथील एमआयएलआयटी संस्थेत जमलेल्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांनी मौलिक विचार मांडले, सर्वोत्तम पद्धती सामायिक केल्या आणि भविष्यासाठी सुसज्ज सेनादलांच्या उभारणीसाठी धोरणांची आखणी केली. या महत्त्वाच्या कार्यक्रमाने, नव्याने उदयाला येत चाललेल्या जागतिक आव्हानांच्या पार्श्वभूमीवर, सातत्यपूर्ण सुधारणा, नवोन्मेष आणि सहयोगी संबंधांप्रति भारतीय सशस्त्र दलांची (Indian Armed Forces) वचनबद्धता अधोरेखित केली. एएफटीआयचे कमांडंट्स आणि निर्णयकर्ते यांना सशस्त्र दलांतील भविष्यकालीन नेत्यांना प्रशिक्षित करण्यात शिक्षण आणि नव्या तंत्रज्ञानांचा स्वीकार अशा संयुक्त संस्कृतीची जोपासना करण्यासंदर्भात मुक्त संवाद तसेच चर्चा करण्यासाठी या बैठकीने एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले.

(हेही वाचा Railway Line Tree Cutting : रेल्वे लगत झाडांवरील फांद्यांच्या छाटणीचा खर्च महापालिकेच्या तिजोरीतूनच )

या बैठकीदरम्यान, नवोन्मेष, तंत्रज्ञानविषयक प्रगती यांचा उपयोग करणे आणि एएफटीआयएस मध्ये जागतिक दर्जाचे प्रशिक्षण मिळणे सुनिश्चित करण्यासाठी संस्थांच्या सर्वोत्तम पद्धतींचा वापर करून घेण्याच्या दृष्टीने धोरणात्मक-लवचिकता, तंत्रज्ञानविषयक प्रगती, मानवी भांडवल विकास, आंतरपरिचालन क्षमता आणि संयुक्तता यांसह इतर अनेक महत्त्वाच्या मुद्यांच्या विस्तृत श्रेणीची चर्चा झाली.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.