Solapur: बागलवाडी येथे तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न, तरुणावर गुन्हा दाखल

178
Solapur: बागलवाडी येथे तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न, तरुणावर गुन्हा दाखल

बागलवाडी (ता. सांगोला) येथे मंगळवारी (७मे) साडेबारा वाजण्याच्या सुमारास ईव्हीएम मशिनवर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. ९० हजारांचे नुकसान झाले. या प्रकरणी संशयित आरोपी दादासो मनोहर चळेकर याच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Solapur)

याबाबत मिळालेली माहिती अशी की, बागलवाडी (Bagalwadi) येथे मतदान चालू होते. अचानक दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास दादासो चळेकर मतदान करण्यासाठी केंद्र क्र. ८६ मध्ये गेले. मतदान करण्याच्या तीन मशिनवर त्यांनी पेट्रोल टाकले. त्यामुळे आग लागल्याने केंद्रात मोठा गोंधळ उडाला. कर्मचाऱ्यांनी आग विझवली. यावेळी संशयित आरोपी बाहेर जाऊन आमच्या गावात पिण्यासाठी पाणी नाही मतदान करायला मशिन कशाला घेऊन आला असे म्हणत होता. (Solapur)

(हेही वाचा – Covishield Vaccine: कोविशिल्डबाबत कंपनीने घेतला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय, जाणून घ्या )

तब्बल एक तास मतदान बंद
या प्रकारामुळे तब्बल एक तास मतदान बंद ठेवण्यात आले. साधारणपणे अर्ध्या तासानंतर दुसऱ्या मशीन जोडून मतदान सुरळीत चालू झाले. या ठिकाणच्या मतदानासाठी वेळेत ही बदल करण्यात आला आहे. यावेळी तहसीलदार संतोष कणसे, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड, पोलीस निरीक्षक भीमराव खणदाळे यांनी भेट देऊन शांतता राखण्याचे आवाहन केले. दादासो चळेकर याला ताब्यात घेतले. त्याच्यावर सांगोला पोलीस ठाण्यात मतदान मशीनचे ९० हजारांचे नुकसान केले. मतदान केंद्रावर बाधा आणली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.