‘त्या’ १०० कोटी वसुलीच्या तपासासाठी बार मालकांची चौकशी!

याप्रकरणात सीबीआयने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह ८ जणांचे जबाब नोंदवले आहेत. त्यात अंधेरी येथील एका बार मालकाचा समावेश होता. या बार मालकाकडून बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझे याला दरमहा अडीच लाख रुपयांचा हप्ता मिळत होता.

107

मुंबईतील बारमधून १०० कोटी रुपयांची वसुलीच्या कथित आरोप प्रकरणात मुंबईतील बार मालक आता अंलबजावणी संचालनालय (ईडी)च्या रडारवर आले आहेत. ईडीने चौकशीकामी पश्चिम उपनगतील काही बार मालकांना समन्स पाठवले असल्याची माहिती ईडीच्या सूत्रांची दिली आहे. या प्रकरणात सीबीआयने पूर्वीच अंधेरीच्या एका बार मालकाचा जबाब नोंदवला असून या बार मालकाकडून दरमहा सचिन वाझेला अडीच लाख रुपयांचा हप्ता देण्यात येत होता.

वाझेला अडीच कोटी देणारा बार मालक 

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे तत्कालीन पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुंबईतील बारमधून १०० कोटी रुपये कथित वसुलीचा आरोप करून राज्यात खळबळ उडवून दिली होती. या प्रकरणी सीबीआयने गुन्हा दाखल करून चौकशी सुरु केली आहे. याप्रकरणात सीबीआयने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह ८ जणांचे जबाब नोंदवले आहेत. त्यात अंधेरी येथील एका बार मालकाचा समावेश होता. या बार मालकाकडून बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझे याला दरमहा अडीच लाख रुपयांचा हप्ता रुपी रक्कम मिळत होती. ही रक्कम पुढे कुणाला जात होती, याबाबत अद्याप खुलासा करण्यात आलेला नाही.

(हेही वाचा : अखेर सापडली… ‘ती’ राजभवनातच!)

बार मालकाची एकेक करून चौकशी करण्यात येणार!

आता ईडीनेच या प्रकरणात उडी घेतली असून मुंबईतून हप्ता देणाऱ्या बारची यादी ईडीने मिळवली आहे. या यादीप्रमाणे ईडीने पश्चिम उपनगरात पाच बार मालकांना चौकशीसाठी समन्स बजावले असून त्यात सचिन वाझेला दरमहा अडीच लाख रुपये देणाऱ्या अंधेरीच्या बार मालकाचा समावेश आहे. ईडीने या सर्वांना चौकशीसाठी बोलावले असून या बार मालकाची एकेक करून चौकशी करण्यात येणार आहे. या बार मालकाकडून कुणाला किती रुपयांची रक्कम पोहचवली जाते याबाबत माहिती मिळवण्यात येणार असल्याची माहिती ईडीच्या सूत्रांनी दिली आहे. या बार मालकाच्या जबाबावरून ईडीकडून तपासाची सूत्रे फिरवण्यात येणार असल्याचे समजते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.