ITC Maratha: मुंबईतील पंचतारांकित हॉटेल तुम्हाला माहीत आहे का? जाणून घ्या

230
ITC Maratha: मुंबईतील पंचतारांकित हॉटेल तुम्हाला माहीत आहे का? जाणून घ्या

आय. टी. सी. मराठा (ITC Maratha) हे मुंबईतील पंचतारांकित हॉटेल आहे. इथे येणाऱ्या पाहुण्यांना व्हिक्टोरियन युगाची भव्यता आणि मराठा राजवंशाचा अनुभव येतो. हे हॉटेल म्हणजे भारतीय आणि ब्रिटिशकालिन इतिहासाचे प्रतीक आहे. येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आकर्षक चित्रांसह महाराष्ट्रातील अनेक घटक पाहायला मिळतात. येथील विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे ‘ट्री ऑफ लाइफ’ या संकल्पनेसह कोरलेली काच आणि प्राचीन मोडी लिपीतील एक कविता ! 

येथील कर्मचाऱ्यांचा ग्राहकांशी असलेला मैत्रीपूर्ण संवाद तसेच पैठणी साड्या परिधान केलेला महिला कर्मचारी वर्ग हेही येथील अनोखे वैशिष्ट्य आहे. मुंबईच्या आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत विमानतळाच्या जवळ हे हॉटेल वसलेले आहे. येथून व्हिसा ऍप्लिकेशन, मुद्रांकन केंद्रे, वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स, जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर, निता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर (एन. एम. ए. सी. सी.) ही ठिकाणे अगदी जवळ आहेत. (ITC Maratha)

आईटीसी मराठा, एक लक्जरी कलेक्शन होटल, मुंबईया हॉटेलमध्ये एकूण ३८० अतिथीगृहे आहेत. या हॉटेलच्या १५व्या मजल्यावर भव्य स्विमिंग पूल आहे. खोल्यांच्या प्रवेशद्वारावर स्वच्छता आणि स्वास्थ्याबाबत करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहितीही देण्यात आली आहे.

सजावट
खोल्यांची सजावट सुसज्ज् आणि प्रशस्त आहे. खोलीत एक मोठ्या आकाराचा बेड, एक लहान सोफा, एक स्मार्ट वर्क डेस्क, एक चहा आणि कॉफी टेबल, फ्रीज, रात्री निवांत झोप लागावी यासाठी एका लहान पेटीमध्ये उशी, आय मास्क, इयरप्लग आणि स्ट्रेस रिलीफ मिस्ट बाय फॉरेस्ट एसेन्शियल्स यासारखी उत्पादने आहेत. स्नानगृह आधुनिक पद्धतीचे आहे. त्यात विलासी एसेन्झा डी व्हिल्स प्रसाधनसामग्री आहे. खोल्यांमध्ये वायफाय सुविधाही आहे. डीव्हीडी प्लेयर, अलार्म घड्याळ, शॉवर, टीव्ही, मिनी बार, बाथरोब आणि चप्पल व्यवसा,अशी सोयी येथे उपलब्ध आहेत.

विश्रांतीसाठी सुविधा…
विश्रांतीसाठी काही सुविधाही येथे आहेत. फिटनेस सेंटर, जलतरण तलाव, सलून, कया कल्प-द स्पा आणि कॅथरीन लाउंज या सुविधांचा वापर येथे विश्रांतीसाठी करता येतो.

पर्यटकांसाठी सोयी-सुविधा
पार्किंग क्षेत्र, स्पा, स्टीम रूम, पाहुण्यांसाठी खेळ, फिटनेस सेंटर आणि व्यायामशाळेचा आनंदही पर्यटकांना येथे घेता येतो. हॉटेल परिसरात तलावही आहे याशिवाय कपडे धुणे, ड्राय क्लीनिंग, एटीएम, खाजगी चेक-इन आणि चेक-आउट, इस्त्री करणे, प्रेस, कार येथे भाड्याने मिळू शकते.

जवळपासची ठिकाणे
पवई तलाव, जुहू बीच आणि वर्सोवा बीच ही ठिकाणे येथून जवळ आहेत.

बैठक
हॉटेलमध्ये अनेक एम. आय. सी. ई. ठिकाणे आहेत. ज्यांचा वापर मोठ्या आणि लहान समारंभासाठी केला जातो.

संपर्क :
आयटीसी मराठा, अ लक्झरी कलेक्शन हॉटेल, मुंबई, सहार, अंधेरी पूर्व, मुंबई ४०००९९

हेही पहा – 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.