“शरद पवारांनी काँग्रेससमोर अट ठेवली होती की, सुप्रिया सुळेंना…” विलिनीकरणाच्या विधानावर Sanjay Nirupam यांचा गौप्यस्फोट

235
"शरद पवारांनी काँग्रेससमोर अट ठेवली होती की, सुप्रिया सुळेंना..." विलिनीकरणाच्या विधानावर Sanjay Nirupam यांचा गौप्यस्फोट

लोकसभा निवडणुकीनंतर अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये (Congress) विलीन होऊ शकतात, असं विधान शरद पवार (Sharad Pawar) यांनी एका मुलाखतीदरम्यान केलं आहे. त्यांच्या या विधानावर आता शिवसेना नेते संजय निरुपम (Sanjay Nirupam ) यांनी गौप्यस्फोट केला आहे. “शरद पवार अनेक दिवसांपासून आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याचा विचार करत होते. शरद पवार यांनी आपल्या मुलीला महाराष्ट्रात काँग्रेसचे नेतृत्व सोपवण्याची विनंती केली होती. ती काँग्रेसने फेटाळून लावली.” असा खुलासा निरुपम यांनी केला. (Sanjay Nirupam )

(हेही वाचा –Vidhan Parishad : राज्याच्या विधान परिषदेतील ४ जागांसाठी निवडणूक जाहीर; कधी होणार मतदान?)

संजय निरुपम (Sanjay Nirupam ) म्हणाले, “अनेक प्रादेशिक पक्ष येणाऱ्या काळात काँग्रेसमध्ये विलीन होऊन जातील. या त्यांच्या भविष्यवाणीमागे त्यांची एक योजना आहे. मी याचा प्रत्यक्ष साक्षीदार आहे. कारण, यापूर्वी अनेकदा त्यांनी अशा प्रकाराचा प्रयत्न केला होता. काँग्रेस पक्षात राष्ट्रवादीचं विलिनिकरण व्हावं, अशी त्यांची इच्छा होती. तसेच दिग्विजय सिंह यांनी तर अधिकृतरित्या विधानही केलं होतं की, शरद पवारांनी आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलिन करावा.” (Sanjay Nirupam )

(हेही वाचा –आदित्य ठाकरेंचं डिपॉजिट जप्त नाही केलं तर मी मिशा ठेवणार नाही: Gunaratna Sadavarte)

“शरद पवारांनी तसा प्रस्तावही काँग्रेसच्या नेतृत्वासमोर ठेवला होता. पण यामध्ये त्यांनी एक अट ठेवली होती ती म्हणजे त्यांच्या मुलीकडं म्हणजे सुप्रिया सुळेंकडं (Supriya Sule) महाराष्ट्र काँग्रेसची जबाबदारी सोपवण्यात यावी. पण त्यांची ही अट मान्य करायला काँग्रेस पक्ष तयार नव्हता. त्यामुळं राष्ट्रवादीचा काँग्रेसमध्ये विलिनिकरणाचा हा कार्यक्रम अद्याप प्रलंबित आहे.” (Sanjay Nirupam )

(हेही वाचा –Lok Sabha Election 2024 : निवडणुकीत काँग्रेसला आठवली अयोध्या)

“पण आज जी बदललेली परिस्थिती आहे, त्यामध्ये त्यांचा पक्ष वाईटरित्या फुटला आहे. त्यामुळं असं वाटतंय की, बारामती त्यांच्या हातातून निसटत आहे. त्यामुळे आपल्या मुलीचं पुनर्वसन करण्यासाठी ते अशा प्रकारचा कार्यक्रम आखत आहेत. पण या विलिनिकरणातून काँग्रेसलाच काय शरद पवारांनाही काही फायदा होईल असं मला वाटत नाही. कारण हे दोन्ही पक्ष तोट्यात चालणाऱ्या कंपन्या आहेत. त्यामुळं दोन शून्य भेटल्यानं मोठा शून्यच तयार होणार आहे. पण तरीही त्यांची काहीतरी धडपड सुरुच आहे.” अशा शब्दांत निरुपम यांनी शरद पवारांवर टीका केली आहे. (Sanjay Nirupam )

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.