Sharad Pawar यांनी ‘राष्ट्रवादी’च्या विलीनीकरणाचे सुतोवाच का केले?

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याचे, विशेष म्हणजे बारामतीचे मतदान होण्याआधीच, राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचे सुतोवाच केल्याने युद्ध संपण्याआधीच शरद पवार यांनी आपली तलवार म्यान केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.

220
Sharad Pawar यांनी ‘राष्ट्रवादी’च्या विलीनीकरणाचे सुतोवाच का केले?
  • सुजित महामुलकर

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट काँग्रेसमध्ये विलीन करण्याचे स्पष्ट संकेत दिले. लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याचे, विशेष म्हणजे बारामतीचे मतदान होण्याआधीच, राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचे सुतोवाच केल्याने युद्ध संपण्याआधीच शरद पवार यांनी आपली तलवार म्यान केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. (Sharad Pawar)

बारामती मतदानाआधीच मुलाखत

लोकसभा २०२४ निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याचे मतदान मंगळवारी ७ मे ला झाले. या टप्प्यात बारामती लोकसभा मतदार संघाचाही समावेश होता. बारामतीतून पवारकन्या सुप्रिया सुळे निवडणूक रिंगणात असून त्यांच्याविरुद्ध शरद पवार (Sharad Pawar) यांची सून सुनेत्रा अजित पवार होत्या. या मतदानाच्या तीन दिवस आधी पवार यांनी ‘इंडियन एक्सप्रेस’ या इंग्रजी दैनिकाला शनिवारी ४ मे ला मुलाखत दिली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याचे सुतोवाच केले. ही मुलाखत आज ८ मे ला प्रसिद्ध झाली. (Sharad Pawar)

उद्धव ठाकरेही काँग्रेसच्याच विचारांचे

पवार यांनी या मुलाखतीत सांगितले की, त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस यांच्यात काहीच फरक नाही. आम्ही (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस) नेहरू आणि गांधी विचारधारा मानणारे आहोत. पवार यांनी उद्धव ठाकरे यांचेही विचार आमच्यासारखेच असल्याचे स्पष्ट केले. (Sharad Pawar)

(हेही वाचा – … तर काँग्रेस श्रीराम मंदिराला ‘बाबरी’ नावाचे कुलूप लागेल; गृहमंत्री Amit Shah यांचा आरोप)

घसा खराब, सभा रद्द, मुलाखत सुरू

पवार यांनी ही मुलाखत शनिवारी रात्री दिल्याचे या वृत्तपत्रात नमूद करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, शनिवारी सायंकाळी पवार यांनी तब्बेत बरी नसल्याने (घशाचा संसर्ग) रविवारच्या सगळ्या सभा रद्द केल्याचे जाहीर केले होते. म्हणजे दोन दिवसांनी बारामतीत होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी तब्येतीचे कारण पुढे करून एक डाव टाकून पाहिला, असा अर्थ यातून निघू शकतो. (Sharad Pawar)

‘शरण’ जाण्यापेक्षा ‘विलीन’ होणे पसंत

गेल्या ६० वर्षाहून अधिक काळ पवार यांनी सक्रिय राजकारण केले. त्यांना राज्यातीलच नाही तर भारतातील राजकारणाचा गाढा अभ्यास आहे. ‘त’ वरून ताकभात ओळखू शकणाऱ्या पवार यांना मतदानाच्या दोन दिवस आधी बारामतीकरांची मानसिकता ओळखता न येणे, शक्य नाही. त्यामुळेच कदाचित बारामतीत सुप्रिया यांचा पराभव समोर दिसू लागल्याने, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांना ‘शरण’ जाण्यापेक्षा राष्ट्रीय काँग्रेस पक्षात विलीन होणे, हा पर्याय त्यांनी का निवडू नये? असा प्रश्न त्यांच्या समर्थकांना पडला तर नवल वाटू नये. (Sharad Pawar)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.