सोमय्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका परवीन शेख (Parveen Shaikh) यांना सोमय्या विद्यालयाने निलंबित केले. परवीन यांनी हमाससारख्या क्रूर दहशतवादी संघटनेचे समर्थन केले. या प्रकरणी सोमय्या विद्यालयाने परवीन शेख यांना निलंबनाची कारवाई केली. विद्यालयाच्या या कारवाईचे हिंदु जनजागृती समितीने स्वागत केले आहे
हमास-इस्रायल संघर्षाप्रकरणी हमासचे केलेले समर्थन
परवीन शेख (Parveen Shaikh) यांना सोमय्या विद्यालयातून निलंबित करण्यात यावे, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने 6 मे रोजी शिक्षण विभागाच्या सचिवांकडे केली होती. हमास-इस्रायल संघर्षाच्या संबंधी हमासबद्दल सहानुभूती दर्शविणारी पोस्ट ‘लाइक’ करत त्यावर परवीन यांनी प्रतिक्रियाही नोंदवली होती. या कारणास्तव शाळा प्रशासनाने त्यांना राजीनामा देण्यास सांगितले होते; मात्र त्यांनी त्यावेळी राजीनामा देण्यास नकार दिल्याने अखेर सोमय्या विद्यालयाने त्यांना निलंबित केले. परवीन शेख (Parveen Shaikh) यांच्यासारखा कोणी उघडपणे दहशतवादाबद्दल सहानुभूती दाखवत असेल किंवा सोशल मीडिया व इतर माध्यमांतून दहशतवाद्यांचे समर्थन करत असेल, तर त्याचा शोध घेऊन कठोर कारवाई करा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने गृह विभागाकडे करण्यात आली होती.
Join Our WhatsApp Community