T20 World Cup 2024 : ब्रायन लाराच्या मते तिसऱ्या क्रमांकावर विराटला नाही, तर सूर्यकुमारला खेळवावं

T20 World Cup 2024 : सूर्यकुमारची ताकद आणि सातत्य पाहता त्यानेच तिसऱ्या क्रमांकावर खेळावं, असं ब्रायन लारा यांना वाटतं. 

194
T20 World Cup 2024 : ब्रायन लाराच्या मते तिसऱ्या क्रमांकावर विराटला नाही, तर सूर्यकुमारला खेळवावं
  • ऋजुता लुकतुके

आगामी टी-२० क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत (T20 Cricket World Cup Tournament) भारताने तिसऱ्या क्रमांकावर सूर्यकुमार यादवला संधी द्यावी असं मत वेस्ट इंडिजचे दिग्गज फलंदाज ब्रायन लारा यांनी व्यक्त केलं आहे. २० षटकांच्या सामन्यात तिसरा क्रमांक हा महत्त्वाचा आहे आणि सूर्यकुमारचं कौशल्य आणि क्षमता पाहता त्यानेच या क्रमांकावर खेळावं, असं लारा यांना वाटतं. इतकंच नाही तर या स्पर्धेत भारत आणि वेस्ट इंडिजचे संघ अंतिम फेरीत आमने सामने यावेत अशीही त्यांची इच्छा आहे. मागच्या आठवड्यात भारताने टी-२० विश्वचषकासाठी (T20 World Cup) भारतीय संघ जाहीर करताना विराट कोहली आणि रोहित शर्मा या ३५ वर्षांच्या वरील खेळाडूंना संघात स्थान देताना शुभमन गिल आणि रिंकू सिंग या युवा खेळाडूंना राखीव ठेवलं आहे. (T20 World Cup 2024)

‘माझा हा सल्ला तुम्हाला आवडेल की नाही, माहीत नाही. पण, सूर्यकुमार सारखा फलंदाज तुमच्याकडे असेल तर तो तिसऱ्या क्रमांकावरच खेळला पाहिजे. सूर्यकुमार सध्या टी-२० (T20) मधील जगातला सर्वोत्तम फलंदाज आहे आणि सर विवियन रिचर्ड्स सारख्या खेळाडूलाही विचारलंत ते सांगतील, सर्वोत्तम खेळाडू तिसऱ्या क्रमांकावरच खेळतो. रिचर्ड्सही याच क्रमांकावर खेळायचे,’ असं लाराने पीटीआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. (T20 World Cup 2024)

(हेही वाचा – Poonch Terrorist Attack मधील 3 संशयितांची छायाचित्रे आली समोर; पाक लष्कराचा माजी कमांडो, लष्कराचा कमांडर आणि…)

सूर्यकुमार १०-१५ षटकं खेळला तर तो संघाची धावसंख्या कुठल्या कुठे घेऊन जाऊ शकतो, असं लारा यांना वाटतं. किंवा त्याने कमी वेळेत छोटेखानी खेळी जरी उभारली तरी संघासाठी ते फायद्याचं ठरेल. सध्याचा भारताचा फलंदाजीचा क्रम पाहिला तर रोहित आणि यशस्वी सलामीला येतात आणि विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करतो. सूर्यकुमार चौथ्या क्रमांकावर खेळतो. रोहित ऐवजी विराटला सलामीला पाठवण्याचा एक विचारही अलीकडे समोर आला आहे. कारण, रोहित आणि विराट सलामीला येऊन सूर्यकुमार तिसरा आला तर यशस्वी जयस्वाल या युवा खेळाडूला कदाचित संघाबाहेर बसावं लागेल. अर्थात, भारताने यावर कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. (T20 World Cup 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.