BMC : मानखुर्दमधील फेरीवाल्यांमुळे नागरिक त्रस्त, केवळ १५ फेरीवाल्यांवर कारवाई करून महापालिका बसली गप्प

मानखुर्द भागात मोठ्याप्रमाणात फेरीवाले बसत असल्याने या अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात लोकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या, त्यानुसार महापालिकेने ही कारवाई केल्याचे म्हटले आहे.

203
BMC : सोमवारची सुट्टी बदलल्याने रजेवर गेलेल्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांपुढे मोठा पेच
BMC : सोमवारची सुट्टी बदलल्याने रजेवर गेलेल्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांपुढे मोठा पेच

एम पूर्व विभागातील मानखुर्द महाराष्ट्र नगर परिसरात अनधिकृत फेरीवाल्यांमुळे स्थानिक रहिवाशी हैराण झाले असून वारंवार तक्रारी करूनही महापालिका प्रशासन याकडे लक्ष देत नाही. मात्र, अखेर मंगळवारी ८ मे २०२४ रोजी महापालिकेने या फेरीवाल्यांविरोधात धडक कारवाई हाती घेतली. या कारवाईत केवळ १५ फेरीवाल्यांवर कार्यवाही करून नागरिकांच्या तक्रारींची दखल घेण्याचे चित्र रंगवण्यात आले. पण प्रत्यक्षात या कारवाई नंतरही त्या भागातील परिसर हा फेरीवाला मुक्त होण्याऐवजी अधिक फेरीवाल्यांमुळे व्यापलेलाच आहे. पण या कारवाईमुळे महापालिका प्रशासन स्वतःची पाठ थोपटून घेण्याचा प्रयत्न करत आहे. (BMC)

या भागात मोठ्याप्रमाणात फेरीवाले बसत असल्याने या अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात लोकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या, त्यानुसार महापालिकेने ही कारवाई केल्याचे म्हटले आहे. या कार्यवाहीअंतर्गत भाजीपाला, फेरीवाल्यांचे बाकडे आणि स्टॅण्ड असे साहित्य जप्त करण्यात आले. ही कार्यवाही महानगरपालिकेच्या कर्मचारी वर्गाच्या मदतीने व स्थानिक पोलिसांच्या सहाय्याने करण्यात आली. (BMC)

(हेही वाचा – भारताने Chinaला ‘या’ उद्योगामध्ये टाकले मागे; आता जगभरात भारताचाच बोलबाला सुरु)

या कार्यवाहीसाठी २ पोलीस कर्मचारी तसेच महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या वरिष्ठ निरीक्षकांसह आठ कामगारांचा आणि वैद्यकीय आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांचा समावेश होता. महापालिकेच्या या कारवाईनंतर हा परिसर फेरीवालामुक्त करण्यात आला असल्याचा दावा प्रशासनाने केला असला तरी प्रत्यक्षात या कारवाईनंतर फेरीवाले हटले नसून उलट कारवाईनंतर पुन्हा एकदा पथारी पसरवून बसल्याचे दिसून आले आहे. (BMC)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.