दिल्लीत सीबीआयने (CBI) मोठी कारवाई केली असून, आरएमएल रुग्णालयात सुरु असलेल्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. सीबीआयने (CBI) रुग्णालयातील २ डॉक्टरांसह एकूण ९ जणांना अटक केली आहे. आरोपी उपचाराच्या नावाखाली रुग्णांची लूट करत होते असा आरोप आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये वैद्यकीय उपकरणांचा पुरवठा करणारेही सहभागी आहेत. रुग्णालयात या सर्वांकडून एका प्रकारचं रॅकेटच चालवलं जात होतं. यामध्ये ते रुग्णाकडून पैसे लुटत होते. (CBI)
सीबीआयने (CBI) डॉक्टर आणि वैद्यकीय उपकरणांशी संबंधित डीलर्सच्या 15 ठिकाणांवर धाडी टाकल्या आहेत.
अडीच लाखांची लाच घेताना अटक
सीबीआयने एफआयआरमध्ये एकूण 16 आरोपींचा उल्लेख केला आहे. आरएमएल रुग्णालयातील असिस्टंट प्रोफेसर डॉक्टर पर्वतगौडा यांना जवळपास अडीच लाखांची लाच घेताना अटक करण्यात आली आहे. ही लाच त्यांना युपीआयच्या माध्यमातून मिळाली होती. याशिवाय रुग्णलायातील कॅथ लॅबचा सीनिअर टेक्निकल इंचार्ज रजनीश कुमार यालाही अटक करण्यात आली आहे. (CBI)
(हेही वाचा –Poonch Terrorist Attack मधील 3 संशयितांची छायाचित्रे आली समोर; पाक लष्कराचा माजी कमांडो, लष्कराचा कमांडर आणि…)
सीबीआयने (CBI) कार्डिओलॉजी विभागातील प्राध्यापक डॉ. अजय राज, नर्स शालू शर्मा, रुग्णालयातील लिपिक भुवल जैस्वाल आणि संजय कुमार गुप्ता यांच्यासह पाच जणांना अटक केली आहे. त्यापैकी चारजण वेगवेगळ्या उपकरणांचा पुरवठा करणाऱ्या कंपन्यांमध्ये काम करतात. या सर्वांना सीबीआयने भ्रष्टाचार प्रतिबंधक आणि गुन्हेगारी कट 120बी अंतर्गत अटक केली आहे. (CBI)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community