Mumbai Darshan : तुम्हालाही घ्यायचे आहे का मुंबई दर्शन? मग वाचा हा लेख

सिद्धिविनायक मंदिर, महालक्ष्मी मंदिर, गेटवे ऑफ इंडिया, मरीन ड्राइव्ह आणि जुहू बीच ही मुंबईतील प्रसिद्ध पर्यटनस्थळे आहेत.

145
Mumbai Darshan : तुम्हालाही घ्यायचे आहे का मुंबई दर्शन? मग वाचा हा लेख

मुंबईला स्वप्नांचे शहर आणि कलांचे शहर म्हटले जाते. मुंबई बंदर हे भारतातील सर्वात मोठे बंदर आहे. १९९५ मध्ये या शहराचे बॉम्बे हे नाव बदलून मुंबई असे ठेवण्यात आले. हे शहर खूप सुंदर शहर आहे, मुंबईत पाहण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत. मुंबा देवी हे मुंबईचे प्रसिद्ध मंदिर आहे, या देवीच्या नावावरूनच या शहराचे नाव मुंबई पडले. (Mumbai Darshan)

सिद्धिविनायक मंदिर, महालक्ष्मी मंदिर, गेटवे ऑफ इंडिया, मरीन ड्राइव्ह आणि जुहू बीच ही मुंबईतील प्रसिद्ध पर्यटनस्थळे आहेत. चला तर मुंबईत तुम्ही काय काय पाहू शकता हे जाणून घेऊया : (Mumbai Darshan)

गेटवे ऑफ इंडिया :

हे भारतातील प्रमुख बंदरांपैकी एक आहे. ही मुंबईची ओळख आहे. हे ब्रिटीश राजवटीत बांधले गेले आणि आज ते एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. (Mumbai Darshan)

सिद्धिविनायक मंदिर :

हे मुंबईतील एक प्रसिद्ध मंदिर आहे जे भगवान गणेशाला समर्पित आहे. इथे रोज हजारो भाविक येऊन दर्शन घेतात. दर मंगळवारी लोक पहाटे आपल्या घरापासून चालत येतात आणि गणपती बाप्पाचे आशीर्वाद घेतात. हे मंदिर दादर पश्चिम येथे आहे. (Mumbai Darshan)

एलिफंटा गुहा :

एलिफंटा केव्ह्ज हे एक सुंदर स्थळ आहे. एलिफंटा लेणीमध्ये प्रामुख्याने विश्व-देव शिव यांना समर्पित असलेली मंदिरे आहेत. यास युनेस्को जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आले आहे. हे फिरण्यासाठी आणि पाहण्यासाठी आदर्श ठिकाण आहे. हे नैसर्गिक नौकानयन ठिकाण आहे. (Mumbai Darshan)

(हेही वाचा – Lok Sabha Election : पाचव्या टप्प्यात 8 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमधील 695 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात)

माउंट मेरी चर्च :

हे वांद्रे परिसरात असलेले प्रसिद्ध ख्रिश्चन तीर्थक्षेत्र आहे. इथे अनेक हिंदू भाविकही दर्शनाला जात असतात. माउंट मेरीची जत्रा लोकप्रिय आहे. (Mumbai Darshan)

छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय :

हे संग्रहालय म्हणजे भारतीय कला, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा म्हणून प्रसिद्ध आहे. इथे दररोज लोक लांबून येतात. विशेषतः विद्यार्थ्यांसाठी आणि अभ्यासकांसाठी हे ठिकाण उपयुक्त आहे. प्राचीन मूर्तींपासून दागिन्यांपर्यंत सर्व प्रकारच्या वस्तू तुम्ही इथे पाहू शकता. (Mumbai Darshan)

हेरिटेज इमारती :

मुंबईत अनेक ऐतिहासिक आणि वैशिष्ट्यपूर्ण इमारती आहेत. या इमारती तुम्ही पाहिल्याच पाहिजेत. (Mumbai Darshan)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.