महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (MPSC) महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ची परीक्षा शनिवार, ६ जुलै २०२४ रोजी होणार आहे. शासनाकडून प्राप्त सुधारित मागणीपत्रानुसार महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा-२०२४ परीक्षेमधून भरावयाच्या विविध संवर्गातील एकूण ५२४ पदांचा सुधारित सविस्तर तपशील आयोगाच्या संकेतस्थळावर देण्यात आले असल्याचे आयोगाने कळविले आहे.
महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित (MPSC) संयुक्त पूर्व परीक्षा-२०२४ करीता २९ डिसेंबर २०२३ रोजी एकूण २७४ रिक्त पदांकरीता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. जाहिरातीनुसार ही परीक्षा २८ एप्रिल २०२४ रोजी घेण्याचे नियोजित होते. दरम्यानच्या काळात महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरीता आरक्षण अधिनियम २०२४, २६ फेब्रुवारी २०२४ नुसार राज्याच्या नियंत्रणाखालील पदांवरील नियुक्तीकरीता सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरीता आरक्षणाची तरतूद विहित करण्यात आली असून ही अधिनियमातील तरतुदी शासन निर्णय २७ फेब्रुवारी २०२४ नुसार विषयांकित संवर्गाच्या विज्ञापित जाहिरातीकरीता लागू आहेत.
प्रस्तुत प्रकरणी सामाजिक व शैक्षणिक शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरीता आरक्षण निश्चिती करून सुधारित मागणीपत्र पाठविण्याबाबत शासनास कळविण्यात आले. यास्तव, आयोगाच्या २१ मार्च २०२४ रोजीच्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे प्रस्तुत परीक्षा पुढे ढकलण्यात आली असल्याचे जाहीर करण्यात आले होते. ही परीक्षा सुधारित दिनांकास म्हणजेच शनिवार, ६ जुलै २०२४ रोजी आयोजित करण्यात आली आहे. शासनाकडून प्राप्त सुधारित मागणीपत्रानुसार महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा-2024 (MPSC) परीक्षेमधून भरावयाच्या विविध संवर्गातील एकूण ५२४ पदांचा सुधारित तपशील खालीलप्रमाणे
- अर्ज सादर करण्याचा कालावधी – ०९ मे २०२४ च्या १४.०० ते तारीख २४ मे २०२४ रोजी २३:५९ पर्यंत
- ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम तारीख – २४ मे २०२४ रोजी २३:५९ पर्यंत
- भारतीय स्टेट बँकेत चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्यासाठी चलनाची प्रत घेण्याचा अंतिम तारीख 26 मे 2024च्या २३:५९ पर्यंत
- चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम तारीख – २७ मे २०२४ रोजी बँकेच्या कार्यालयीन वेळेमध्ये
पदे व संख्या
(एक) राज्य सेवा परीक्षा :- एकूण पदे 431
Join Our WhatsApp Community