शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडले, अशी अप्रत्यक्ष कबुलीच ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिली. “उद्धव ठाकरे यांचे विचार आमच्यासारखेच (काँग्रेस) आहेत”, असे पवार एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे खरे वैचारिक वारसदार एकनाथ शिंदेच आहेत, या शिंदे यांच्या दाव्याला दुजोरा मिळाला. (Eknath Shinde)
‘राष्ट्रवादी’ काँग्रेसमध्ये विलीन होणार
लोकसभा २०२४ निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याचे मतदान मंगळवारी ७ मे ला झाले. या टप्प्यात बारामती लोकसभा मतदार संघाचाही समावेश होता. बारामतीतून पवारकन्या सुप्रिया सुळे निवडणूक रिंगणात असून त्यांच्याविरुद्ध शरद पवार यांची सून सुनेत्रा अजित पवार मैदानात होत्या. या मतदानाच्या तीन दिवस आधी पवार यांनी ‘इंडियन एक्सप्रेस’ या इंग्रजी दैनिकाला शनिवारी ४ मे ला मुलाखत दिली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा राष्ट्रीय काँग्रेसमध्ये विलीन करण्याचे सुतोवाच केले. ही मुलाखत आज ८ मे ला प्रसिद्ध झाली. या मुलाखतीत पवार यांनी त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राष्ट्रीय काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतो, असे सांगतानाच अन्य प्रादेशिक पक्षही काँग्रेससोबत जाऊ शकतात किंवा कॉँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात, असे मत व्यक्त केले. (Eknath Shinde)
खरा वारसदार असल्याचा दावा
२०१९ नंतर अडीच वर्षे काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सत्तेत असताना उद्धव ठाकरे यांनी अनेकदा हिंदुत्वाचा नारा दिला. तसेच आपण हिंदुत्व सोडले नाही, असा उघडपणे प्रचार करीत असे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २०२२ मध्ये ४० आमदारांसह बंड केले. त्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा वारसदार आपणच असा दावा शिंदे तसेच उद्धव ठाकरे या दोघांनी अनेकदा केला. (Eknath Shinde)
हिंदुत्व सोडल्याची अनेक उदाहरणे
शिंदे यांनी बंड केल्यानंतर, विशेषतः गेल्या वर्षभरात, ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या भूमिकेत बदल झाल्याची अनेक उदाहरणे देता येतील. महत्वाचे म्हणजे ठाकरे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर हे नाव उच्चारले, असं वर्षभरात एकदाही झाले नाही. भाषणाची सुरुवात करताना ‘माझ्या हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो’ अशी होत असे, त्यात बदल होऊन हिंदू शब्द वगळला गेला. आता ‘माझ्या देशभक्त बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो’ अशी सुरुवात केली जाऊ लागली. इतकंच काय शिवसेना उबाठा गटाचे लोकसभा उमेदवार, उमेदवारी अर्ज भरायला जात असताना बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाला भेट देतात, मात्र रस्त्यापालिकडे असलेल्या सावरकर स्मारकात जाणे टाळतात. राम मंदिराच्या प्रतिष्ठापना सोहळ्याकडे त्यांनी काँग्रेसप्रमाणे पाठ फिरवली. ‘जय श्रीराम’चा नारा विसरले. (Eknath Shinde)
(हेही वाचा – CBI ची धडक कारवाई! दिल्लीत डॉक्टरच रुग्णांकडून घेत होते लाच, ९ जण अटकेत)
मुस्लिम समुदायाला उबाठा जवळची
ठाकरे यांच्यासाठी या बाबी क्षुल्लक असू शकतात, पण बाळासाहेब ठाकरे यांचे विचार मानणाऱ्यांसाठी हा बदल पचणी पडणारा नाही. सर्वसामान्य जनतेच्यादेखील असे बदल लक्षात येत असतात. ज्या अर्थी मुस्लिम समुदायाला शिवसेना उबाठा जवळची वाटू लागली, तेव्हाच पक्षाची अधोगती सुरू झाल्याचे हे द्योतक आहे. (Eknath Shinde)
केवळ गांधींच्या ‘गुड बूक’मध्ये राहण्यासाठी
काँग्रेस नेते राहुल गांधी यांना स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल चीड असल्याने गांधींच्या ‘गुड बूक’मध्ये राहण्यासाठी ठाकरे यांनीही सावरकर यांचे नाव घेणे सोडल्याचे बोलले जात आहे. ठाकरे यांना पूर्वी भाजपासारख्या राष्ट्रीय पक्षाचा आधार घ्यावा लागला तर आता एका राष्ट्रीय पक्षाशी लढण्यासाठी ‘शत्रूचा शत्रू, आपला मित्र’ या म्हणीप्रमाणे भाजपाचा शत्रू असलेल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या वळचणीला जाण्यासाठी तत्वांशी करावी लागलेली ही राजकीय तडजोड आहे, असे बोलले जाते. (Eknath Shinde)
उबाठा काँग्रेसमध्ये?
शरद पवार यांच्या नजरेतून हे बदल सुटणे केवळ अशक्य होते. त्यामुळेच यांनी आज, बुधवारी प्रसिद्ध झालेल्या मुलाखतीत ‘उद्धव ठाकरे यांचे विचार आमच्यासारखेच आहेत आणि समविचारी (काँग्रेस) पक्षांसोबत काम करण्यास सकारात्मक आहेत,” असे सांगून उद्या शिवसेना उबाठा गट काँग्रेसमध्ये विलीन झाला तरी नवल वाटू नये, असा संदेश पवारांनी महाराष्ट्राला दिला. (Eknath Shinde)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community