Pakistan : पाकिस्तानी सैन्य अधिकाऱ्याकडून १०० मुलांचे लैंगिक शोषण

178
पाकिस्तानी (Pakistan) लष्कराचा सर्वात मोठा सेक्स स्कँडल खैबर पख्तूनख्वाच्या आदिवासी भागात तैनात असलेल्या कर्नल ते मेजर पदापर्यंतच्या काही अधिकाऱ्यांच्या मुलांच्या लैंगिक शोषणाचे 600 हून अधिक व्हिडिओ समोर आले आहेत.
मुलांचे वय 14 वर्षांपेक्षा कमी असल्याचे सांगितले आहे. पाच वर्षांपासून शंभरहून अधिक मुलांचे लैंगिक शोषण होत होते. काही अधिकाऱ्यांना पाराचिनार कँटमधून पेशावर कमांड मुख्यालयात बोलावण्यात आले आहे. कमांडर लेफ्टनंट जनरल हसन अझहर हयात यांनी कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे आदेश देताना कोणत्याही अधिकाऱ्याच्या लैंगिक शोषणात सहभाग असल्याचा इन्कार केला आहे.
लष्कराचा दावा आहे की, तीन वर्षांपूर्वीही अधिकाऱ्यांवर 13 वर्षांच्या मुलाचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप होता, जो खोटा असल्याचे आढळून आले. दरम्यान, एफआयआरनंतर पोलिसांनी एका स्थानिक दुकानदाराला लैंगिक शोषण प्रकरणात अटक केली आहे. या भागातील दुकानदार ताहिर कबाडी हा लष्कराच्या जवळचा होता. गरीब मुलांचा पुरवठा त्यानेच केला. तो लहान मुलांना प्रलोभन देऊन अधिकाऱ्यांकडे पाठवत असे, तसेच लहान मुलांच्या लैंगिक शोषणाचे व्हिडीओही बनवत असे. 2015 मध्ये पाकिस्तानमध्ये  (Pakistan) लहान मुलांच्या लैंगिक शोषणाचे व्हिडिओ व्हायरल करण्याचे मोठे रॅकेट उघडकीस आले होते. त्यात सुमारे 400 व्हिडिओ होते. हे व्हिडिओ प्रत्येकी 50 रुपयांना विकले गेले. मात्र, या प्रकरणात लष्कराच्या अधिकाऱ्यांचा सहभाग नव्हता.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.