Hardik Pandya Hairstyle : हार्दिक पांड्याच्या ९ प्रसिद्ध हेअरस्टाईल

Hardik Pandya Hairstyle : हार्दिक पांड्या अगदी काही दिवसांत आपली हेअरस्टाईल बदलण्यासाठी ओळखला जातो 

469
  • ऋजुता लुकतुके

या हंगामात मुंबई इंडियन्स संघाचं आव्हान बाद फेरी आधीच संपुष्टात आलं आहे. त्यासाठी निवनिर्वाचित कर्णधार हार्दिक पांड्याला टिकेचं (Hardik Pandya Hairstyle) धनीही व्हावं लागलं आहे. एरवी हार्दिक हा आत्मविश्वासाने भरलेला आणि आयुष्य जिंदादिल पद्धतीने जगणारा खेळाडू म्हणून ओळकला जातो. त्यालाही विरोधात जाणारे सामन्यांचे निकाल आणि प्रेक्षकांचा रोष सहन करणं कधी कधी कठीण जात होतं.  मैदानावरील या प्रतिकूल परिस्थितीमुळे असेल कदाचित पण, हार्दिकच्या नियमितपणे दिसणाऱ्या नवनवीन हेअरस्टाईल या हंगामात फारशा दिसलेल़्या नाहीत. तो सुरुवातीपासून आतापर्यंत एकाच हेअरस्टाईलमध्ये आपल्याला दिसला आहे. (Hardik Pandya Hairstyle)

एरवी हार्दिकची हेअरस्टाईल हा सतत बदलणारा आणि दरवेळी चर्चेत असणारा विषय आहे. आलिम हकीम या हेअरस्टायलिंस्टकडून हार्दिक करून घेत असलेली प्रत्येक हेअरस्टाईल ही गाजते. अशा कित्येक हेअरस्टाईल सोशल मीडियावर आजही तुम्हाला पाहयला मिळतील. यातील प्रसिद्ध ९ हेअरस्टाईल इथं पाहूया, (Hardik Pandya Hairstyle)

(हेही वाचा- Konkan Railway 2024: यंदा गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचे होणार हाल!)

१. लाँग स्पाईक्स हेअरस्टाईल – क्रिकेटमध्ये नवीन असतानाच हार्दिकने लाँग स्पाईक्स हेअरस्टाईल ठेवली होती. क्रिकेटच्या मैदानावर ही स्टाईल आणण्याचा मानही हार्दिकला जातो. खालचे केस विरळ करून फक्त वरचे केस स्पाईक पद्धतीने वर उभे विंचरायचे अशी ही स्टाईल आहे.  (Hardik Pandya Hairstyle)

New Project 2024 05 09T104818.962

२. हायलायटेड हेअरकट – केसांची एकादी बट किंवा एका भागातील केसांना वेगळा रंग देण्याला हायलायटेड लुक असं म्हणतात. हे रंग अर्थातच केसांच्या नैसर्गिक रंगाच्या अगदी विरोधी रंगाचे किंवा उठून दिसणारे असतात. निळा, चंदेरी, गुलाबी अशा रंगछटा हायलायटेड लुकसाठी प्रसिद्ध आहेत. हार्दिकने या सगळ्या छटा वापरल्या आहेत. यातील निळ्या रंगाची सगळ्यात जास्त चर्चा झाली होती. (Hardik Pandya Hairstyle)

New Project 2024 05 10T075215.999

३. हाफ – हेड हेअरकट – नावाप्रमाणेच डोक्याच्या अर्ध्या भागावर केस आहेत आणि उर्वरित भागावर नाहीत, अशी ही हेअरस्टाईल आहे. यात कधी कधी हार्दिकने डोक्याच्या टाळू आणि कपाळाच्या वर भागात केस ठेवले आहेत. कानाच्या खाली ते विरळ करत आणले आहेत. तर एका हेअरस्टाईलमध्ये त्याने चक्क डोक्याच्या एका बाजूला केस ठेवले आहेत. तर दुसऱ्या बाजूला ते विरळ केले आहेत.  (Hardik Pandya Hairstyle)

New Project 2024 05 10T075407.932

(हेही वाचा- Air India Express ची मोठी कारवाई! वैद्यकीय रजेवर गेलेल्या कर्मचाऱ्यांना दिले टर्मिनेशन लेटर)

४. बझ हेअरकट – आता बझ हेअरकट अगदी नियमितपणे पाहायला मिळत असला आणि क्रिकेटच्या मैदानावरही तो नेहमीचा झाला असला तरी त्याचीही सुरुवात हार्दिकनेच केली आहे. डोक्यावर केस आणि त्या खाली अगदी जेमतेम केसाची मूळं दिसतील, असा हा कट आहे. हार्दिकने अगदी बारीक केस कापताना एकदा आपला आयपीएल संघ मुंबई इंडियन्सचा ‘एम’ही काढला होता.  (Hardik Pandya Hairstyle)

New Project 2024 05 10T075515.277

५. शॉर्ट स्पाईक्ड – हार्दिकची शॉर्ट स्पाईक्ड हेअर स्टाईलही प्रसिद्ध आहे. २००० च्या दशकाच्या सुरुवातीला ही हेअरस्टाईल भारतात तरुणांमध्ये गाजत होती. हार्दिकची ही आवडती स्टाईल असावी. कारण, अधून मधून तो ही स्टाईल नियमितपणे करत असतो. (Hardik Pandya Hairstyle)

New Project 2024 05 10T075606.178

६. टक्कल किंवा अतिशय विरळ केस – तीन वर्षांपूर्वी मुंबई इंडियन्सकडून खेळतानाच हार्दिकने टक्कल असलेला लुक ठेवला होता. वर टक्कल आणि ओठांच्या वर विरळ मिशी असा त्याचा हा लुक होता. त्यानंतर आणखी काही वेळा त्याने बॉल्ट लुक ठेवला आहे. (Hardik Pandya Hairstyle)

Untitled design 81

(हेही वाचा- Sudhakar Badgujar: ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजरांना तडीपारीची नोटीस!)

७. साईड – फेड हेअरस्टाईल – साईड फेडेड लुक हा जेन-झी पिढीचा आवडता लुक मानला जातो. क्रिकेटच्या मैदानातही तो अनेक खेळाडूंमध्ये दिसतो. कपाळ ते टाळू या भागावर केस आहेत. तिथून कानाच्या खाली केस अगदी छोटे किंवा काहीवेळा पूर्णपणे काढून टाकलेले असतील तर तो झाला साईड – फेडेड लुक. (Hardik Pandya Hairstyle)

Untitled design 81 1 1

८. मेस्सी हेअर आणि मोठी दाढी – अस्ताव्यस्त पसरलेले केस आणि हनुवटीवरही दाढीची खुंटं वाढलेली अशी ही आधुनिक हेअरस्टाईल आहे. तरुण पिढीचा बेदरकारपणा या स्टाईलमधून दिसतो. अगदी या हंगामातही हार्दिकचा लुक असाच आहे. त्याने तो चांगला वागवला आहे. (Hardik Pandya Hairstyle)

९. टेक्चर्ड स्पाईक्ड लुक – फुटबॉलपटूंना शोभणारा आणि फुटबॉल मैदानात नियमितपणे दिसणारा हा हेअरकट आहे. केसांना स्पाईक दिलेला असला तरी तो छोटा आहे. एकूण ही स्टाईल ही सैन्यातील लोकांसारखी आहे. झिरो कट पण, डोक्यावरील केसांना छोटा स्पाईक अशी ही स्टाईल आहे. हार्दिकला ती शोभूनही दिसते. (Hardik Pandya Hairstyle)

Untitled design 81 2

हेही पहा- 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.