Mumbai Airport Runway: ६ तास बंद राहणार, जाणून घ्या काय आहे कारण

181
Mumbai Airport Runway: मुंबई विमानतळावरील धावपट्टी ६ तास बंद राहणार, जाणून घ्या काय आहे कारण

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (Mumbai International Airport) आणि देशांतर्गत विमानतळावरील धावपट्टी (Runway) ९ मे २०२४ रोजी पूर्णपणे बंद राहणार आहे. ९ मे रोजी सकाळी ११ ते संध्याकाळी ५ या वेळेत मुंबई विमानतळावर कोणतीही विमानसेवा सुरू राहणार नाही. गुरुवारी मुंबईच्या दोन्ही विमानतळांच्या धावपट्टीवर पावसाळा आणि नियमित देखभालीची सर्व कामे केली जाणार आहे. त्यामुळे या कालावधीत प्रवासी विमानांची कोणतीही उड्डाणे होणार नाहीत. (Mumbai Airport Runway)

MIAL च्या प्रसिद्धीनुसार, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील (CSMIA) मान्सूनच्या पूर्वतयारी धोरणानुसार, प्राथमिक धावपट्टी ०९/२७ आणि दुय्यम धावपट्टी १४/३२ या या दोन्ही धावपट्टी तात्पुरती बंद ठेवण्यात येणार आहेत.  (Mumbai Airport Runway)

(हेही वाचा – Air India Express ची मोठी कारवाई! वैद्यकीय रजेवर गेलेल्या कर्मचाऱ्यांना दिले टर्मिनेशन लेटर)

एअरलाइन कंपन्या (Airline Company) आणि इतर संबंधित कंपण्याना डिसेंबर २०२३ मध्येच माहिती देण्यात आली होती. जेणेकरून विमान उड्डाणाचे सुधारित वेळापत्रक बनवले जाईल. त्यामुळे देखभालीच्या कामांमुळे विमान उड्डाण वाहतुकीवर कोणताही परिणाम होणार नाही. (Mumbai Airport Runway)

मुंबई विमानतळ हे सुमारे १०३३ एकरमध्ये पसरलेले आहे. मुंबई विमानतळावर धावपट्टी (Mumbai Airport Runway), टॅक्सीवे आणि पायाभूत सुविधांचे मोठे जाळे पसरलेले आहे. त्यामुळे पावसाळ्यात होणारे अपघात टाळता यावेत यासाठी मुंबई विमानतळाच्या देखभालीचे कामे पावसाळ्यापूर्वी करण्यात येतात. (Mumbai Airport Runway)

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.