Mahanand चा ताबा मदर डेअरीकडे

महानंदची आर्थिक स्थिती डबघाईला आल्यानंतर पुनरुज्जीवनाची प्रक्रिया सुरु करण्यासाठी मदर डेअरीला चालवण्यास देण्याचा निर्णय झाला होता.

182
Mahanand चा ताबा मदर डेअरीकडे

महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ, मर्यादित, मुंबई अर्थात महानंदचा ताबा आता गुजरातमधील मदर डेअरीकडे देण्यात आला आहे. महानंदच्या हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. ही प्रक्रिया २ मे रोजी पूर्ण झाली आहे. मदर डेअरीला राज्य सरकार महानंदच्या पुनरुज्जीवनासाठी २५३ कोटी रुपयांचं अर्थसहाय्य करणार आहे. (Mahanand)

महानंद या संस्थेची स्थापना ९ जून १९६७ रोजी करण्यात आली होती. राज्यातील दूधसंघांची शिखर संस्था म्हणून या दूध संघाची ओळख होती. महानंद ही संस्था २००४ पर्यंत फायद्यात होती. मात्र, यानंतर राज्यातील दूध संघांनी स्वत:च्या नावाच्या ब्रँडने दूध विक्री सुरु केली. यानंतर महानंदला उतरती कळा लागली. (Mahanand)

(हेही वाचा – Amol Kirtikar यांच्या प्रचारात मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीचा सहभाग)

२००४ नंतर पुढील अवघ्या १२ वर्षांच्या काळात म्हणजेच २०१६ पर्यंत महानंद सुरु राहणार की नाही अशी स्थिती निर्माण झाली होती. महानंदची आर्थिक स्थिती डबघाईला आल्यानंतर पुनरुज्जीवनाची प्रक्रिया सुरु करण्यासाठी मदर डेअरीला चालवण्यास देण्याचा निर्णय झाला होता. (Mahanand)

महानंद संस्था राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाकडे हस्तांतरित करण्यामध्ये प्रमुख अडसर हा महानंदचे संचालक मंडळ हा होता. गुजरातमधील आनंद जिल्ह्यातील राष्ट्रीय दुग्धविकास मंडळानं महानंदला संचालक मंडळ नको असल्याबाबतची अट घातली होती. त्यानुसार फेब्रुवारी महिन्यात महानंदचे चेअरमन राजेश परजणे यांच्यासह संचालक मंडळानं राजीनामा दिला होते. (Mahanand)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.