कॉंग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी सॅम पित्रोदा (Sam Pitroda) यांच्या वर्णभेदी विधानाला पाठिंबा दिल्यामुळे कॉंग्रेसच्या विरोधात वातावरण निर्माण झाले आहे. सॅम पित्रोदा आणि अधीर रंजन चौधरीच नव्हे तर संपूर्ण कॉंग्रेस पक्ष वर्णद्वेषी असल्याचा आरोप भाजपाने केला आहे. (Sam Pitroda)
लोकसभेतील विरोधी पक्ष नेते अधीर रंजन चौधरी यांच्या विधानामुळे देशात नवीन वाद सुरू झाला आहे. धर्मनिरपेक्ष पक्ष अशी स्वत:ची प्रतिमा रंगविणाऱ्या कॉंग्रेस पक्षाचे नेते वर्णभेदी विधान करताना दिसत आहेत. ओव्हरसीज कॉंग्रेसचे प्रमुख सॅम पित्रोदा (Sam Pitroda) यांनी आधी ईशान्येकडील आणि दक्षिणेकडील लोकांबाबत भेदभावपूर्ण विधान केले होते. ‘पूर्वेतील भारतीय हे चिनीसारखे दिसतात तर दक्षिणेकडील काही नागरिक आफ्रिकेतील लोकांसारखे दिसतात’, असे ते म्हणाले होते. (Sam Pitroda)
(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : काँग्रेसच्या विरोधी पक्ष नेत्याची विकेट जाणार?)
राहुल गांधी सॅम पित्रोदांना म्हणायचे अंकल
सॅम पित्रोदा (Sam Pitroda) यांच्या या विधानामुळे देशात वाद निर्माण झाला असतानाच अधीर रंजन चौधरी यांनी पित्रोदा यांचे समर्थन केले आहे. चौधरी म्हणाले की, ‘भारतातील अनुवांशास्त्रानुसार भारतात विविध प्रकारचे लोक राहतात. यात ‘एन-वर्ड टाइप क्लास’ आणि ‘मंगोलॉइड क्लास’ आहे. मात्र, चौधरी यांच्या या विधानामुळे संपूर्ण देशात नाराजी व्यक्त केली जात आहे. (Sam Pitroda)
भाजपा प्रवक्ते शहजाद पुनावाला यांनी संपूर्ण कॉंग्रेस पक्ष वर्णद्वेषी असल्याचा आरोप केला आहे. तर, केंद्रीय महिला व बाल कल्याण विकासमंत्री स्मृती इराणी यांनी सुध्दा कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर शरसंधान साधले आहे. राहुल गांधी सॅम पित्रोदा यांना अंकल म्हणतात. त्यांचे मार्गदर्शक आहे. हेच मार्गदर्शन त्यांनी कॉंग्रेसला केले आहे, असा टोलाही त्यांनी लावला. दरम्यान, सॅम पित्रोदा (Sam Pitroda) यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. मात्र, राजीनामा दिला की घेतला गेला? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. (Sam Pitroda)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community