IPL 2024 SRH vs LSG : सनरायझर्स हैद्राबादने लखनौ विरुद्ध सगळ्यात मोठा विजय मिळवताना इतर विक्रमही मोडले

IPL 2024 SRH vs LSG : हैद्राबादने दुसरी फलंदाजी करताना फक्त ४५ मिनिटांत १६६ धावा केल्या. 

134
IPL 2024 SRH vs LSG : सनरायझर्स हैद्राबादने लखनौ विरुद्ध सगळ्यात मोठा विजय मिळवताना इतर विक्रमही मोडले
  • ऋजुता लुकतुके

या हंगामात सनरायझर्स हैद्राबादची कामगिरी सातत्यपूर्ण झालेली नसेल. पण, त्यांनी धावा करताना जो धडाका लावलाय तो अविश्वसनीय आहे. आताही लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध त्यांनी विजयासाठी आवश्यक १६५ धावा दहाव्या षटकातच पूर्ण केल्या. वेळेचा हिशेब सांगायचा तर ४५ मिनिट त्यांनी घेतली. इतकंच नाही तर या काळात एकही गडी गमावला नाही. म्हणजे त्यांच्या अभिषेक शर्मा आणि ट्रेव्हिस हेड या सलामीवीरांनीच ही कामगिरी त्यांच्यासाठी फत्ते केली. (IPL 2024 SRH vs LSG)

ट्रेव्हिस हेडने ३० चेंडूंत नाबाद ८९ धावा झळकावल्या. तर अभिषेक २८ चेंडूंत ७५ धावा केल्या. दोघांनी पहिल्या षटकात ८ धावा घेतल्या. ते एकमेव शांत षटक म्हणावं लागेल. कारण, त्यानंतर त्यांनी जी गोलंदाजीची कत्तल सुरु केली ती एकेका षटकांत कमीत कमी सतरा धावा निघाल्या. फलंदाजीचा हा अविष्कार सनरायझर्स हैद्राबादने या हंगामात वारंवार दाखवून दिला आहे. २८७ धावांचा सर्वोत्तम धावसंख्येचा विक्रम हा त्यातीलच एक. (IPL 2024 SRH vs LSG)

आणि या कामगिरीबरोबरच हैद्राबादने आयपीएलमधील सांघिक कामगिरीचे आणखी काही विक्रमही मोडले. त्यावर एक नजर टाकूया. (IPL 2024 SRH vs LSG)

(हेही वाचा – संघ आणि विहिंपच्या नेत्यांची नावे घेण्यासाठी माझ्यावर दबाव टाकला; Lt. Col. Purohit यांचा गौप्यस्फोट)

१० षटकांत सर्वाधिक धावा

१६७/०, सनरायझर्स हैद्राबाद विरुद्ध लखनौ (राजीव गांधी स्टेडिअम, २०२४)

१५८/४, सनरायझर्स हैद्राबाद विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (अरुण जेटली स्टेडिअम, २०२४)

१४८/२, सनरायझर्स हैद्राबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स (राजीव गांधी स्टेडिअम, २०२४)

१४१/२, मुंबई इंडियन्स विरुद्ध हैद्राबाद (राजीव गांधी स्टेडिअम, २०२४) (IPL 2024 SRH vs LSG)

सर्वात जास्त चेंडू राखून मिळवलेला विजय (१०० धावांपेक्षा मोठं लक्ष्य)

६२, सनरायझर्स हैद्राबाद वि, लखनौ (२०२४)

५७, दिल्ली कॅपिटल्स वि. पंजाब (२०२२)

४८, डेक्कन चार्जर्स वि. मुंबई (२००८) (IPL 2024 SRH vs LSG)

पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक धावा, (सनरायझर्स हैद्राबादने दोनदा शंभरहून अधिक धावा केल्या आहेत)

१२५/०, सनरायझर्स हैद्राबाद वि. दिल्ली (दिल्ली २०२४)

१०७/२, सनरायझर्स हैद्राबाद वि. लखनौ (हैद्राबाद २०२४)

१०५/०, कोलकाता नाईट रायडर्स वि. बंगळुरू (बंगळुरू २०१७)

१००/२, चेन्नई सुपर किंग्ज वि. पंजाब (मुंबई २०१४)

९३/१, पंजाब किंग्ज वि. कोलकाता (कोलकाता २०२४) (IPL 2024 SRH vs LSG)

१०० हून मोठ्या भागिदारीसाठी सर्वात कमी चेंडू

३० – ट्रेव्हिस हेड व अभिषेक शर्मा वि. दिल्ली (दिल्ली २०२४)

३४ – ट्रेव्हिस हेड व अभिषेक शर्मा वि. लखनौ (हैद्राबाद २०२४)

३६ – हरभजन सिंग व जे सुचित वि. पंजाब (मुंबई २०१५)

३६ – सी लिन व सुनील नरेन वि. बंगळुरू (बंगळुरू २०१७) (IPL 2024 SRH vs LSG)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.