अशा प्रकारे दिली होती Maharana Pratap यांनी मुघलांना कडवी झुंज

169

महाराणा प्रताप (Maharana Pratap) हे राजस्थानच्या मेवाड प्रांतातील राजे होते. त्यांनी हल्दीघाटी या ठिकाणी मुघलांविरुद्ध कडवी झुंज दिली. महाराणा प्रताप यांचा जन्म ९ मे १५४० साली राजस्थान येथील मेवाड प्रांतातील कुंभळगढ किल्ल्यावर राजे दुसरे उदयसिंग आणि जयवंताबाई यांच्या पोटी झाला. महाराणा प्रताप यांना दोन सावत्र बहिणी होत्या. चांद कुंवर आणि मन कुंवर अशी त्यांची नावं होती.

१५७२ साली महाराणा प्रताप (Maharana Pratap) यांचे वडील उदयसिंग यांना देवाज्ञा झाली. त्यानंतर मेवाडचे ५४ वे सम्राट म्हणून महाराणा प्रताप यांना गादीवर बसवण्यात आलं. पण त्यामुळे त्यांचा सावत्र भाऊ जगमल याने त्यांच्यासाठी सुडाची भावना ठेवली कारण त्याला गादीवर बसायचं होतं. पण तसं न घडल्यामुळे तो सूड घेण्यासाठी पेटून उठला. महाराणा प्रताप यांचा सूड उगवण्यासाठी तो अजमेरला निघून गेला आणि तिथे अकबराच्या सैन्यात सामील झाला. अकबराकडून त्याने जहाजपूर हे शहर जहांगीरीत मिळवलं.

महाराणा प्रताप (Maharana Pratap) यांनी आपल्या कारकिर्दीत कधीही मुघलांशी हातमिळवणी केली नाही, कुठलाही राजकीय करार केला नाही. त्यांच्या धोरणामुळे त्यांचं वेगळेपण टिकून राहीलं. महाराणा प्रताप आणि अकबर यांच्यामध्ये हल्दीघाटीची लढाई झाली. १५६७ ते १५६८ या सालादरम्यान चित्तौडगढला वेढा घातल्यामुळे मेवाड राज्याचा सुपीक असलेला पूर्व पट्टा मुघलांच्या हाती गेला. पण तरीही अरवली पर्वतरांगेमध्ये उरलेला वनविभाग आणि डोंगराळ परिसर अजूनही महाराणा प्रताप (Maharana Pratap) यांच्या ताब्यात होता.

(हेही वाचा संघ आणि विहिंपच्या नेत्यांची नावे घेण्यासाठी माझ्यावर दबाव टाकला; Lt. Col. Purohit यांचा गौप्यस्फोट)

१५७२ साली महाराणा प्रताप यांचा राज्याभिषेक झाला तेव्हा महाराणा प्रताप यांच्याशी राजकीय करार करण्यासाठी अकबराने आपले अनेक राजदूत पाठवले. पण प्रत्येक वेळेस महाराणा प्रताप यांनी अकबराच्या अधीन होण्यास स्पष्ट नकार दिला. मुत्सद्देगिरी करून मेवाड जिंकण्याचे सगळे मार्ग बंद पडले तेव्हा अकबराने आक्रमण करण्याचं ठरवलं. महाराणा प्रताप (Maharana Pratap) आणि मुघल तसेच मुघलांच्या बाजूने लढत असलेला राजपूत सेनापती मानसिंग यांच्या सैन्याची १८७६ साली राजस्थान इथल्या गोगुंडा जवळच्या हल्दीघाटी नावाच्या एका अरुंद खिंडीपलीकडे झुंज झाली. यालाच हल्दीघाटीची लढाई म्हणून ओळखलं जायला लागलं. महाराणा प्रताप यांनी सुमारे ३००० घोडदळ आणि ४०० भिल्ल धनुर्धारी अशी फौज उतरवली.

मानसिंगने जवळजवळ १०,००० लोकांच्या सैन्याचं नेतृत्व कलं. ही झुंज तीन तासांपेक्षा जास्त काळ चालली. या भयंकर लढाईनंतर महाराणा प्रताप (Maharana Pratap) खूप जखमी झाले होते. त्यांना माघार घ्यावी लागली. पण ते स्वतःचा जीव वाचवण्यात यशस्वी झाले आणि दुसऱ्या दिवशी लढण्यासाठी पुन्हा सज्ज झाले. शेवटी या लढाईत मुघल जिंकले. लढाई झाल्यामुळे मेवाडच्या सैन्याला लक्षणीय जीवितहानी झाली पण महाराणा प्रताप यांना पकडण्यात मुघल अयशस्वी ठरले. हल्दीघाटीच्या लढाईत मिळवलेला विजय हा मुघलांसाठी निरर्थक होता. कारण ते उदयपूरमध्ये महाराणा प्रताप किंवा त्यांच्या कुटुंबातल्या कुठल्याही सदस्याला मारण्यात किंवा पकडण्यात यशस्वी झाले नाहीत. महाराणा प्रताप यशस्वीपणे मुघलांच्या हातून निसटून गेले. हल्दीघाटी इथली मोहीम संपल्यानंतर अकबरने स्वतः सप्टेंबर १५७६ मध्ये राणा प्रताप सिंग (Maharana Pratap) यांच्याविरोधात सतत मोहीमा चालवल्या. त्यानंतर गोगुंडा, उदयपूर आणि कुंभलगड हे सर्व मुघलांच्या ताब्यात गेले.

(हेही वाचा Giriraj Singh : भारताला इस्लामिक राष्ट्र बनवण्याचा काँग्रेसचा डाव; केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांच्याकडून काँग्रेसचा समाचार )

शाहबाज खान कंबोह याने अनेक आक्रमणांचे नेतृत्व केले ज्यामुळे मेवाडमधील प्रमुख क्षेत्र जसे की कुंभलगड, मंडलगढ, गोगुंडा आणि मध्य मेवाड ताब्यात घेण्यात आले आणि त्यांना कायमस्वरूपी मुघलांच्या अधिपत्याखाली आणले. शाहबाज खानच्या आक्रमणानंतर मुघल साम्राज्याने मेवाडमध्ये आपले वर्चस्व प्रस्थापित केलं, यामुळे शेवटी महाराणा प्रताप यांची शक्ती खूप कमकुवत झाली होती. म्हणून त्यांना त्यांच्या डोंगराळ  भागात असलेल्या निवासस्थानाकडे निघून जावं लागलं.

बंगाल आणि बिहार प्रांतामधल्या बंड आणि मिर्झा हकीम याने पंजाबमध्ये घुसखोरी झाल्यानंतर १५८९ सालानंतर मेवाडवर असलेला मुघलांचा दबाव बऱ्यापैकी कमी झाला. यानंतर १५८४ साली अकबराने जगन्नाथ कच्छवाहा याला मेवाड प्रांतावर स्वारी करण्यासाठी पाठवलं. पण यावेळीसुद्धा मेवाडच्या सैन्याने मुघलांचा पराभव करून त्यांना माघार घ्यायला भाग पाडलं. १५८५ साली अकबर लाहोरला गेला आणि वायव्येकडील परिस्थिती पाहता पुढची बारा वर्षं तिथेच राहिला. या काळादरम्यान कोणतीही मोठी मुघल फौज मेवाडवर आक्रमण करण्यासाठी पाठवली गेली नाही. याच परिस्थितीचा फायदा घेऊन महाराणा प्रताप (Maharana Pratap) यांनी मेवाड आणि मंडलगढ येथील काही प्रदेश परत मिळवला.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.