मोदींबाबतच्या त्या विधानाबाबत मुंबई भाजपाची Sanjay Raut यांच्या विरोधात मुख्य निवडणूक आयुक्तांकडे तक्रार

174
मोदींबाबतच्या त्या विधानाबाबत मुंबई भाजपाची Sanjay Raut यांच्या विरोधात मुख्य निवडणूक आयुक्तांकडे तक्रार

उबाठा शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते व राज्यसभा सदस्य संजय राऊत यांच्या विरोधात भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांकडे तक्रार केली आहे. संजय राऊत यांनी सांगलीमध्ये पत्रकार परिषदेत प्रसार माध्यमांशी बोलतांना, मोदींचे आरोग्य बिघडले आहे. आपल्या या लाडक्या नेत्यावर उपचार करणे, अशाप्रकारचे वक्तव्य केले. राऊत यांच्या वारंवार खोट्या आणि खोडसाळ विधानासाठी भारतीय निवडणूक आयोगाने त्यांना जबाबदार धरले पाहिजे. आदर्श आचारसंहिता, निवडणूक गुन्ह्यांचे उल्लंघन आणि भारतीय दंड संहितेच्या विविध तरतुदींनुसार कारवाई करणे करण्याची मागणी शेलार यांनी केली. ज्यात भाजपाने आदर्श आचारसंहिता उल्लंघन प्रकरणी त्यांना वैयक्तिक तसेच प्रसार माध्यमांशी बोलण्यास आळा घालण्यात यावे किंवा त्यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात यावे अशाप्रकारची मागणी केली आहे. (Sanjay Raut)

शिवसेना उबाठा पक्षाचे मुख्य प्रवक्ते व पक्षाचे स्टार प्रचारक संजय राऊत यांनी सांगली येथील प्रचार परिषदेत, “मोदीजी की बाते मत किजीए वे बिमार हैं, आप उनकी बातें सुन लिजिए, आप उनका चेहरा देखो, आप उनका हालचाल देखिए, वे बिमार चल रहे. अब कौनसी बिमारी है क्या है, मानसिक बिमारी है, या कुछ शारिरीक बिमारी है, लेकीन मोदीजी बिमार है, जिस प्रकार कें वक्तव्य कर रहे है, लगता है देश कें प्रधानमंत्री बहुत बिमार है. ते पुढे असेही म्हणाले की मोदींचे मानसिक आरोग्य पूर्णपणे बिघडले आहे. आपल्या या लाडक्या नेत्याला उपचार करणे गरजेचे आहे अशाप्रकारचे विधान केल्याचा उल्लेख भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांकडे केलेल्या तक्रारीत केला आहे. (Sanjay Raut)

(हेही वाचा – Fraud : बँकेकडे गहाण असलेले विमान विकले, नेदरलँडस्थित कंपनीची फसवणूक)

आशिष शेलार यांनी केली ‘ही’ मागणी 

या तक्रारीच्या पत्रामध्ये शेलार यांनी, संजय राऊत यांनी ही भाषा वापरुन सभ्यतेच्या मर्यादा ओलांडली आहे आणि आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केले आहे, असे म्हटले आहे. असे विधान राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी जी, यांच्या विरोधात जाणीवपूर्वक व वारंवार निवडणूक प्रचारात करत आहेत. पंतप्रधानांच्या आरोग्याबाबत अशाप्रकारे चुकीचे विधान हे त्यांची प्रतिष्ठा मलिन करण्याचा उद्देशाने केले गेले आहे, असे नमुद केले आहे. राऊत हे वारंवार खोटी आणि खोडसाळ विधान करत असल्याने भारतीय निवडणूक आयोगाने त्यांना जबाबदार धरले पाहिजे. यासाठी आदर्श आचारसंहिता, निवडणूक गुन्ह्यांचे उल्लंघन आणि भारतीय दंड संहितेच्या विविध तरतुदींनुसार कारवाई करणे आवश्यक आहे. राऊत यांनी कलम 4.4.2(B)(v) आदर्श आचारसंहितेचे थेट उल्लंघन केले आहे. (Sanjay Raut)

मागील २२ मार्च २०२४ रोजी संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात सांगली/बुलढाण्यात आणि आता पुन्हा त्यांनी पंतप्रधानांच्या विरोधात वैयक्तिक आणि आक्षेपार्ह विधान केले आहे. स्टार प्रचारकाने प्रचार करताना आदर्श आचारसंहिता आणि कायदेशीर चौकटीत राहून प्रचार करणे आणि यामुळे निवडणुकीचे वातावरण बिघडू नये यासाठीची काळजी घेणे आवश्यक असते. त्यामुळे आयोगाला विनंती करत शेलार यांनी राऊत यांच्या विरोधात कारवाई करून पंतप्रधान यांच्या विरोधात कोणतेही वैयक्तिक वक्तव्य हे निवडणूक होईपर्यंत करू नये अशाप्रकारे बंदी घालावी अशी मागणी केली आहे. तसेच या लोकसभा निवडणुका संपेपर्यंत त्यांना माध्यमांशी बोलण्यास बंदी घालावी तसेच त्यांच्या विरोधात आदर्श आचारसंहिता व निवडणूक कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी एफआयआर दाखल करण्याची मागणी शेलार यांनी पत्रकाद्वारे केली आहे. (Sanjay Raut)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.