इंदिरा गांधींचे गुरु Dhirendra Brahamachari यांची संपत्ती सरकार जमा होणार ? काय आहे प्रकरण

इंदिरा गांधींचे गुरु Dhirendra Brahamachari यांची संपत्ती सरकार जमा होणार ? काय आहे प्रकरण

208
इंदिरा गांधींचे गुरु Dhirendra Brahamachari यांची संपत्ती सरकार जमा होणार ? काय आहे प्रकरण
इंदिरा गांधींचे गुरु Dhirendra Brahamachari यांची संपत्ती सरकार जमा होणार ? काय आहे प्रकरण

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांचे गुरु अशी ओळख असलेले धीरेंद्र ब्रह्मचारी यांची संपत्ती सरकार जमा होणार का? हा प्रश्न सध्या चर्चेत आहे. साधू किंवा संन्यासी यांच्या मृत्यूनंतर त्यांची संपत्ती, मालमत्ता ही सरकार जमा होते, असा नियमच आहे. धीरेंद्र ब्रह्मचारी यांच्या प्रकरणात न्यायालयाने हरियाणा सरकारला ही विचारणा केली आहे की, त्यांनी धीरेंद्र ब्रह्मचारींची संपत्ती ताब्यात घेतली आहे का? या प्रकरणी आता २९ मे रोजी सुनावणी केली जाणार आहे.

(हेही वाचा – …तर हिंदूंसाठी एकही देश शिल्लक राहणार नाही; BJPचा काँग्रेसवर हल्लाबोल)

या प्रकरणी न्यायालयाने म्हटले आहे की, धीरेंद्र ब्रह्मचारी हे एक संन्यासी होते. त्यांनी एका सोसायटीची स्थापना केली होती. त्यानंतर त्यांनी संन्यास घेण्याचा निर्णय जाहीर केला. अशा प्रकारे जर कुणीही संन्यासी त्यांची संपत्ती मागे सोडून जात असतील, तर ती संपत्ती मालक नसलेली संपत्ती किंवा मालमत्ता असते. त्यानुसार ही संपत्ती सरकार जमा झाली पाहिजे. कारण संन्यासी धीरेंद्र ब्रह्मचारी यांचा मृत्यू झाला आहे.

(हेही वाचा – Milind Deora : जे स्वत:च्या इमारतीतील लोकांना न्याय देऊ शकत नाही, ते जनतेच्या समस्या काय सोडवणार! देवरांनी घेतला सावंतांचा समाचार)

काय आहे प्रकरण

धीरेंद्र ब्रह्मचारी यांच्या मृत्यूनंतर त्यांचे एक नातेवाईक आणि एक भाडेकरु सिलोखरा गावातील मालमत्तेचा मालकी हक्क मिळावा; म्हणून कायदेशीर लढाई लढत आहेत. हे प्रकरण २४ एकर जमिनीच्या मालकीचे आहे. या जमिनीवर पूर्वी एक धावपट्टी होती. त्याची मालकी १९८० च्या दशकापासून अपर्णा आश्रमाचे संस्थापक आणि इंदिरा गांधींचे गुरु धीरेंद्र ब्रह्मचारींकडे होती. जून १९९४ मध्ये त्यांचा विमान अपघातात मृत्यू झाला. त्यानंतर त्यांची संपत्ती आणि ही मालमत्ता यांचा वाद निर्माण झाला.

धीरेंद्र ब्रह्मचारी यांनी १९८३-८४ च्या दरम्यान अपर्णा आश्रम सोसायटीची नोंदणी रजिस्ट्रार ऑफ सोसायटीज दिल्लीमध्ये केली होती. या सोसायटीचे प्रतिनिधी आहोत असं सांगणाऱ्या दोघांनी २७ डिसेंबर २०२० रोजी ५५ कोटींच्या मोबदल्यात ही जमीन दिल्लीच्या चार कंपन्यांच्या नावे ट्रान्सफर करण्याचे ठरवले होते. मात्र डीसी गुडगावने विक्री करार रद्द केला होता.

जस्टिस राजबीर सहरावत यांनी अपर्णा आश्रम सोसायटी आणि एका व्यक्तीद्वारे दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करताना हा आदेश जारी केला आहे. काही लोक या सोसायटीचा दुरुपयोग करत आहेत, त्यासाठी त्यांना दोषी ठरवण्यात आले आहे. काही लोक या अपर्णा आश्रमाची जागा विकत आहेत, असेही समोर आले होते. ज्यानंतर हा आदेश देण्यात आला.

कोण होते धीरेंद्र ब्रह्मचारी

धीरेंद्र १९५८ मध्ये दिल्लीला पोहोचले. इंदिरा गांधींसह त्यांची पहिली भेट काश्मीरमधील शिकारगडमध्ये झाली होती. धीरेंद्र ब्रह्मचारींनी आधी पंडित नेहरूंना योग शिकवायला सुरुवात केली. त्यानंतर काही दिवसांतच लाल बहादूर शास्त्री, जयप्रकाश नारायण, मोरारजी देसाई आणि डॉ. राजेंद्र प्रसाद यांसह अनेक नेते त्यांचे अनुयायी बनले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.