- ऋजुता लुकतुके
यंदाच्या आयपीएलमध्ये स्पर्धेतून बाद होणारा मुंबई इंडियन्स (IPL 2024, Mumbai Indians) हा पहिला संघ ठरला आहे. सनरायझर्स हैद्राबादने लखनौ संघाचा ६२ चेंडू आणि १० गडी राखून पराभव केल्यानंतर मुंबई आपोआपच स्पर्धेतून बाहेर झाली. संघातील काही खेळाडूंना हा पराभव जिव्हारी लागला आहे. आणि हंगामात सुरुवातीपासून खेळाडूंमध्ये असलेली खदखद आता बाहेर येत असल्याचं बोललं जात आहे. संघातील ज्येष्ट खेळाडू हे हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) विरोधात असून त्यांनी एक स्वतंत्र बैठक घेतल्याची बातमी आता पसरली आहे. (IPL 2024, Mumbai Indians)
(हेही वाचा- IPL 2024, K L Rahul : के एल राहुल शेवटच्या दोन सामन्यांपूर्वी लखनौ संघाची कप्तानी सोडेल का?)
हार्दिकच्या कप्तानीच्या शैलीवर खेळाडू नाराज आहेत. रोहित शर्मा (Rohit Sharma), जसप्रीत बुमरा (Jasprit Bumrah) आणि सुर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) यांनी बैठक घेऊन संघ हितासाठी आता काय केलं पाहिजे, यावर चर्चा केल्याचं समजतंय. इतर खेळाडूंमध्येही वेगवेगळ्या बैठका झाल्याची शक्यता आहे. इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्राने याविषयीची बातमी दिली आहे. मागची १० वर्षं मुंबई इंडियन्स संघाचं नेतृत्व रोहित शर्माकडे (Rohit Sharma) होतं. या काळात संघाने पाचवेळा लीगचं विजेतेपद पटकावलं. रोहित हा खेळाडू आणि फ्रँचाईजीचे चाहते यांच्यामध्ये लोकप्रिय होता. (IPL 2024, Mumbai Indians)
यंदाच्या हंगामापूर्वी संघ प्रशासनाने अचानक नेतृत्व हार्दिक पांड्याकडे (Hardik Pandya) सोपवण्याचा निर्णय घेतला. आणि हा नेतृत्व बदल खेळाडूंना रुचला नसल्याचं एका संघ प्रशासनातील व्यक्तीने कबूल केल्याचं इंडियन एक्सप्रेसने म्हटलं आहे. ‘अचानक झालेला नेतृत्व बदल कधी कधी खेळाडूंना पचत नाही. हा बदल खेळाडूंमध्ये रुजणं महत्त्वाचं असतं. तसं मुंबईच्या बाबतीत झालं नाही,’ असं या सूत्रांनी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितलं आहे. (IPL 2024, Mumbai Indians)
(हेही वाचा- शिवसेना भवनात फ्रँकी खाल्ली अन् शिंदेंना साथ देण्यासाठी सुरतला निघालो: Uday Samant)
हार्दिक पांड्यावर (Hardik Pandya) या हंगामात अनेकदा टीका झाली. फलंदाजीच्या क्रमात वारंवार केलेले बदल, जसप्रीत बुमराला (Jasprit Bumrah) पॉवर प्लेमध्ये गोलंदाजी न देणं, स्वत:चा हरवलेला फॉर्म आणि दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या पराभवानंतर मीडियाशी बोलताना संघातील एक सहकारी तिलक वर्माची जाहीर काढलेली चूक अशा अनेक गोष्टी हार्दिकच्या विरोधात आहेत. विशेष म्हणजे हार्दिकने जाहीरपणे पराभवाला तिलक वर्माला जबाबदार धरलं तेव्हा तो संघातील सगळ्यात जास्त धावा करणारा फलंदाज होता. (IPL 2024, Mumbai Indians)
एकंदरीत मुंबई इंडियन्ससाठी हा हंगाम चुकीच्या गोष्टींसाठी लक्षात राहील हे नक्की. (IPL 2024, Mumbai Indians)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community