ManiShankar Iyer: पाकिस्तानकडे अणुबॉम्ब, भारताने आदर करावा; काँग्रेसच्या वक्तव्याने एकच खळबळ

283
ManiShankar Iyer: पाकिस्तानकडे अणुबॉम्ब, भारताने आदर करावा; काँग्रेसच्या वक्तव्याने एकच खळबळ
ManiShankar Iyer: पाकिस्तानकडे अणुबॉम्ब, भारताने आदर करावा; काँग्रेसच्या वक्तव्याने एकच खळबळ

सॅम पित्रोदा यांच्यानंतर आता काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर (ManiShankar Iyer) यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ते म्हणत आहेत, ‘पाकिस्तानकडे (Pakistan) अणुबॉम्ब, भारताने पाकिस्तानचा आदर करावा.’ मणिशंकर अय्यर (ManiShankar Iyer) यांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात एकच खळबल उडाली आहे. या नेत्यांच्या वक्तव्यामुळे काँग्रेसच्या अडचणीत भर पडत आहे. (ManiShankar Iyer)

(हेही वाचा –Dabholkar murder case प्रकरणी संजीव पुनाळेकर, वीरेंद्र तावडे, विक्रम भावे निर्दोष; शरद कळसकर आणि सचिन अंधुरे दोषी)

काँग्रेस नेते मणिशंकर (ManiShankar Iyer) यांचा मुलाखतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अय्यर म्हणाले की, “पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे, हे आपण विसरुन चालणार नाही. सध्या देशात सत्तेवर असलेलं सरकार आम्ही पाकिस्तानसोबत चर्चा करणार नाही, असं का सांगत आहे हे मला कळत नाही आहे. तिथे दहशतवाद असल्याने आम्ही त्यांच्याशी चर्चा करणार नाही, असं सरकार का सांगतयं? दहशतवादाला संपविण्यासाठी चर्चा अत्यंत गरजेची आहे. पाकिस्तान विचार करत असेल की, भारत गर्विष्ठपणा दाखवत जगभरात आम्हाला हिणवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे पाकिस्तानमधील कोणताही माथेफिरू त्यांच्याकडील अणुबॉम्बचा वापर करु शकतो.” (ManiShankar Iyer)

(हेही वाचा –IPL 2024, K L Rahul : के एल राहुल शेवटच्या दोन सामन्यांपूर्वी लखनौ संघाची कप्तानी सोडेल का?)

अय्यर (ManiShankar Iyer) पुढे म्हणाले की, “पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहेत तसे ते आमच्याकडेही आहेत. मात्र जर कुणी माथेफिरूने लाहोरमध्ये अणुबॉम्ब टाकण्याचा निर्णय घेतला तर त्याचा किरणोत्सार अमृतसरपर्यंत पोहोचण्यास ८ सेकंदही लागणार नाहीत. जर आम्ही त्यांचा सन्मान केला तर ते शांत राहतील. मात्र आपण त्यांना कमीपणा देत राहिलो तर त्यांच्यापैकी कुणीतरी माथेफिरू येईल आणि बॉम्ब टाकेल.” असं वक्तव्य मणिशंकर यांनी केलं आहे. (ManiShankar Iyer)

भाजपाचा हल्लाबोल

मणिशंकर अय्यर (ManiShankar Iyer) यांच्या या व्हायरल व्हिडिओवर भाजपाने हल्लाबोल केला आहे. अय्यर यांच्या वक्तव्यावरून उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव (Keshav Prasad Maurya) यांनीही काँग्रेसवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, “2024 च्या लोकसभा निवडणुकीत दारुण पराभवाची खात्री पाहून काँग्रेसचे लोक भयभीत झाले आहेत. जगातील सर्वात सक्षम दारूगोळा असलेल्या भारतीय लष्करावर ज्यांचा विश्वास नाही, त्यांनी भारतात राहण्याऐवजी पाकिस्तानात जावे.” असा पलटवार भाजपाकडुन करण्यात आला आहे. (ManiShankar Iyer)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.