IPL 2024, RCB vs PBKS : बंगळुरूचा पंजाबवर ६० धावांनी मोठा विजय 

IPL 2024, RCB vs PBKS : या विजयामुळे बंगळुरूचं स्पर्धेतील आव्हान कायम राहिलं आहे 

141
IPL 2024, RCB vs PBKS : बंगळुरूचा पंजाबवर ६० धावांनी मोठा विजय 
IPL 2024, RCB vs PBKS : बंगळुरूचा पंजाबवर ६० धावांनी मोठा विजय 
  • ऋजुता लुकतुके

आयपीएलमध्ये  (IPL 2024, RCB vs PBKS)आता शेवटचा टप्पा सुरू झाला आहे. त्यामुळे प्रत्येक सामन्याचा निकाल ठरवतो कुणाचं आव्हान कायम राहणार आणि कुणाचं संपुष्टात येणार. गुरुवारी, उशिरा सूर गवसेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने पंजाब किंग्जचा ६० धावांनी पराभव केला. त्यामुळे आपलं आव्हान क्षीण का होईना, कायम ठेवलं. आणि पंजाब किंग्जला मात्र स्पर्धेतून आऊट केलं. धरमशाला मैदानावर हायब्रीड खेळपट्टीवर झालेला हा सामनाही फलंदाजांनी गाजवला. बंगळुरू संघाने पहिली फलंदाजी करत ७ बाद २४१ धावा केल्या. हे आव्हान चांगली सुरूवात करुनही पंजाबला पेलवलं नाही. १८१ धावांवर त्यांचा संघ सर्वबाद झाला.  (IPL 2024, RCB vs PBKS)

(हेही वाचा- शिवसेना भवनात फ्रँकी खाल्ली अन् शिंदेंना साथ देण्यासाठी सुरतला निघालो: Uday Samant)

बंगळुरूसाठी स्टार फलंदाज विराट कोहलीने ४७ चेंडूंत ९२ धावा केल्या. त्याच्या स्ट्राईकरेटची सतत चर्चा होत असल्यामुळे तो सांगणं अनिवार्य आहे. स्ट्राईकरेट १९५ धावांचा होता. २ बाद ४३ धावसंख्या असताना त्याने आधी रजत पाटीदार (Rajat Patidar)बरोबर आणि मग कॅमेरुन ग्रीन (Cameron Green )बरोबर अर्धशतकी भागिदाऱ्या केल्या. वेग कायम राखत संघाला अडिचशेच्या जवळ आणून ठेवलं. रजत पाटिदारनेही २३ चेंडूंत ५५ धावा तर ग्रीनने २७ चेंडूंत ४६ धावांचं योगदान दिलं. विराटला सामनावीराचा पुरस्कार मिळाला.  (IPL 2024, RCB vs PBKS)

बंगळुरूच्या २४१ धावांचा पाठलाग करताना जॉनी बेअरस्टो (Jonny Bairstow), रिली रसॉ (Riley Raso) आणि शशांक सिंग (Shashank Singh) यांनी दणक्यात सुरुवात केली होती. धावगतीही १२ धावांच्या आसपास राखली होती. पण, ठरावीक अंतराने बळी जात राहिले. बंगळुरूच्या फिरकीपटूंनी धावा दिल्या तरी बळी मिळवणं सोडलं नाही. क्षेत्ररक्षकांनीही त्यांना साथ दिली. रसॉने २७ चेंडूंत ६१ धावा केल्या. शशांक सिंगनेही ३७ धावा केल्या. पण, हे दोघं बाद झाल्यावर एक बाजू लावून धरेल असा फलंदाज पंजाबकडे गुरुवारी नव्हता. तिथे संघ कमी पडला. तर फिरकीपटूंनी स्वप्निल सिंग आणि कर्ण शर्मा यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवले. मोहम्मद सिराजनेही तीन बळी टिपले.  (IPL 2024, RCB vs PBKS)

(हेही वाचा- IPL 2024, Mumbai Indians : मुंबई इंडियन्स संघात दोन तट? ज्येष्ठ खेळाडू हार्दिकच्या विरोधात?)

शिवाय पंजाबने पहिल्या डावात क्षेत्ररक्षण करताना पाच झेल सोडले. यातील दोन विराट कोहलीचे (Virat Kohli), तो ० आणि १० धावांवर असताना सोडले. तर रजत पाटिदारही शून्यावर असताना त्याला जीवदान मिळालं. क्षेत्ररक्षणातील ही ढिलाईही संघाला महागात पडली. या पराभवामुळे पंजाबचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. तर बंगळुरूचा संघ सातव्या स्थानावर असला तरी त्यांना धुगधुगती आशा अजूनही आहे. (IPL 2024, RCB vs PBKS)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.