इराणने इस्रायली मालवाहू जहाजातून ओलीस ठेवलेल्या ५ भारतीय खलाशांची गुरुवारी, (९ मे) सुटका केली. इराणमधील भारतीय दुतावासाने ही माहिती दिली. त्यांच्या सुटकेची माहिती देताना भारतीय दूतावासाने इराणी अधिकाऱ्यांचे, बंदर अब्बासमधील दूतावास आणि भारताच्या वाणिज्य दूतावास यांच्याशी जवळून समन्वय साधल्याबद्दल आभार मानले आहेत. त्यामुळे भारताच्या प्रयत्नांना यश आले मिळाले आहे. (Iran Released)
या सहकार्याबद्दल इराणमधील भारतीय दूतावासाने इराणच्या अधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत. खरे तर इस्रायलवर हल्ला करण्यापूर्वी इराणने ओमानच्या आखातातील होर्मुझ खिंडीतून भारतात येणारे पोर्तुगीज ध्वज असलेले जहाज ताब्यात घेतले होते. १३ एप्रिल रोजी ही माहिती देण्यात आली. त्यात २५ क्रू मेंबर्स उपस्थित होते, त्यात १७ भारतीय आणि २ पाकिस्तानी होते. हे जहाज एका इस्रायली अब्जाधीशाचे होते.
(हेही वाचा – Dabholkar murder case प्रकरणी संजीव पुनाळेकर, वीरेंद्र तावडे, विक्रम भावे निर्दोष; शरद कळसकर आणि सचिन अंधुरे दोषी)
भारताने आत्तापर्यंत काय केले?
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने जोसेफच्या सुटकेवर सांगितले होते की भारत सरकार जहाजावर उपस्थित असलेल्या उर्वरित 16 भारतीयांच्या संपर्कात आहे. सर्व क्रू मेंबर्स निरोगी आहेत आणि ते भारतातील त्यांच्या कुटुंबीयांच्या संपर्कात आहेत. या लोकांच्या घरी परतण्यासाठी इराणच्या अधिकाऱ्यांशी बोलणी सुरू आहेत.
भारतीय नागरिकांना भेटण्याची परवानगी देणार
भारताचे परराष्ट्र मंत्रालय राजनैतिक माध्यमांद्वारे इराणच्या अधिकाऱ्यांच्या सतत संपर्कात आहे. जहाजात अडकलेल्या उर्वरित भारतीयांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यापूर्वी १४ एप्रिल रोजी परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी सांगितले होते की, त्यांनी या संदर्भात इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांशी चर्चा केली आहे. ते म्हणाले होते की, भारतीय अधिकाऱ्यांना लवकरच क्रूमध्ये समाविष्ट असलेल्या भारतीय नागरिकांना भेटण्याची परवानगी दिली जाईल.
युएई सोडल्यानंतर हे जहाज भारतात येत होते
१३ एप्रिल रोजी, MCS Aries या इस्रायली अब्जाधीशांचे जहाज होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जात होते, ते इराणी सैन्याने ताब्यात घेतले. इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सचे कमांडो यूएईहून निघालेल्या जहाजावर हेलिकॉप्टरने उतरले होते. हे जहाज त्यांच्या हद्दीतून परवानगीशिवाय जात असल्याचा आरोप इराणने केला होता. एका इस्रायली अब्जाधीशाचीही या जहाजात भागीदारी आहे.
जगातील २० टक्के तेल होर्मुझ खिंडीतून जाते
जगातील २० टक्के तेल होर्मुझ खिंडीतून जाते ज्यातून इराणने भारतात येणारे जहाज ताब्यात घेतले आहे. इराणची राज्य वृत्तसंस्था IRNAने २०२३ मध्ये दावा केला होता की इराणने होर्मुझ खिंडीत अनेक बॅलेस्टिक आणि क्रूझ क्षेपणास्त्रे तैनात केली आहेत. जे एकामागून एक अनेक लक्ष्यांवर हल्ला करू शकतात. केवळ इराणच नाही, तर अमेरिकेनेही या भागात वेगाने सैन्य आणि शस्त्रे तैनात केली. अमेरिकेने आपली A-10 थंडरबोल्ट २ युद्ध विमाने, F-16 आणि F-35 लढाऊ विमाने तैनात केली आहेत. याशिवाय अनेक अमेरिकन युद्धनौकाही या भागात आहेत.
हेही पहा –