शरद पवार (Sharad Pawar) यांनी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना एक मोठं वक्तव्य केलं होतं. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर काही प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये (Congress) विलीन होतील, असं शरद पवार यांनी एका मुलाखतीत म्हटले होते. यानंतर शरद पवारांच्या या विधानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी भाष्य करत थेट शरद पवारांनाच मोठी ऑफर दिली आहे.
बाळासाहेब ठाकरेंना आज किती दु:ख होत असेल
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची आज नंदूरबारमध्ये महायुतीच्या उमेदवार हिना गावीत यांच्या प्रचारासाठी सभा पार पडली. या सभेत बोलताना मोदी यांनी ठाकरे गट आणि शरद पवार गटावर टीका केली. “नकली शिवेसना मला जिवंत गाडण्याची भाषा करते. मात्र, मी बाळासाहेब ठाकरे यांना जवळून पाहिले आहे. बाळासाहेब ठाकरे यांना आज किती दु:ख होत असेल.” असा हल्लाबोल पंतप्रधान मोदी यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर केला. यानंतर त्यांनी शरद पवारांच्या विधानावर भाष्य केले. (PM Narendra Modi)
बारामतीच्या निवडणुकीनंतर ते चिंतेत असावेत
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) म्हणाले, “४० ते ५० वर्षांपासून महाराष्ट्राचे एक मोठे नेते राजकारणात आहेत. सध्या ते काहीही भाष्य करत आहेत. बारामतीच्या निवडणुकीनंतर ते चिंतेत असावेत. त्यांनी अनेक चांगल्या लोकांबरोबर काही विचार विनिमय करून त्यांनी ते विधान केले असावे. ४ जूननंतर राजकारणात टिकून राहायचं असेल तर छोट्या-छोट्या पक्षांना काँग्रेसमध्ये विलीन व्हावं लागू शकतं. असं त्यांना वाटलं असेल.” (PM Narendra Modi)
PM Narendra Modi:
“Fake Sena & Fake NCP have decided to merge into Congress after 4 June.
~ Instead of doing this, come and join hands with our Ajit Dada & Shinde Ji, we will fulfill all dreams.”👌🏼 pic.twitter.com/xMddUXmKhw— The Analyzer (News Updates🗞️) (@Indian_Analyzer) May 10, 2024
काँग्रेसबरोबर जाण्यापेक्षा अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्याबरोबर या
“छोटे छोटे प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन व्हायला पाहिजे, असे शरद पवार यांनी विधान केलं होतं. त्यांच्या विधानाचा अर्थ असा आहे की, नकली राष्ट्रवादी आणि नकली शिवसेना पक्षाने काँग्रेसमध्ये विलीन होण्याचे मन तयार केलं आहे. मात्र, मी त्यांना सांगतो ४ जूननंतर काँग्रेसबरोबर जाण्यापेक्षा अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्याबरोबर या. सर्व स्पप्न पूर्ण होतील.” असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. (PM Narendra Modi)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community