Lok Sabha Election 2024 : पंतप्रधानांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी भाजपाचा मेगा प्लॅन

Lok Sabha Election 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा नवीन  इतिहास घडविण्याच्या तयारीत आहेत. मोदी येत्या 14 मे रोजी वाराणसीमधून तिसऱ्यांदा उमेदवारी अर्ज भरणार आहेत.

190
Lok Sabha Election 2024 : पंतप्रधानांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी भाजपाचा मेगा प्लॅन
Lok Sabha Election 2024 : पंतप्रधानांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी भाजपाचा मेगा प्लॅन

लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) पुन्हा एकदा नवीन इतिहास घडविण्याच्या तयारीत आहेत. मोदी येत्या 14 मे रोजी वाराणसीमधून तिसऱ्यांदा उमेदवारी अर्ज भरणार आहेत. परंतु, अर्ज भरण्याची प्रक्रिया नेत्रदीपक करण्याची तयारी भाजपाने केली आहे. तत्पूर्वी, 13 मे रोजी पंतप्रधनांचा जंगी रोड शो बघायला मिळणार आहे. (Lok Sabha Election 2024)

(हेही वाचा- IPL 2024 Play-Off Chances : उर्वरित साखळी सामन्यांतून कुणाला बाद फेरीची संधी?)

वाराणसीत सातव्या टप्प्यात मतदान

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या वाराणसी मतदारसंघात 1 जून रोजी मतदान होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) सातव्या अर्थात शेवटच्या टप्प्यात आठ राज्यांतील 57 जागांवर मतदान होणे आहे. यात उत्तरप्रदेशातील 13 जागांचा समावेश आहे. सातव्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 14 मे आहे. (Lok Sabha Election 2024)

मोदी 14 मे ला अर्ज भरणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) 14 मे रोजी वाराणसी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यासाठी मोदी यांच्या अर्जावर प्रस्तावक म्हणून कोण राहणार? यावरही गंभीर मंत्रणा करण्यात आली आहे. (Lok Sabha Election 2024)

(हेही वाचा- भाकरी खायची भारताची आणि चाकरी करायची पाकिस्तानची; CM Eknath Shinde यांचा काँग्रेसवर हल्लाबोल)

प्रस्तावकांसाठी 18 नावांची यादी

भाजपातील सूत्रानी दिलेल्या माहितीनुसार, प्रस्तावक होण्यासाठी 18 लोकांची यादी तयार करण्यात आली आहे. ही यादी दिल्लीला पाठविण्यात आली असून यातील चार नावांची निवड करण्यात येणार आहे. प्रस्तावकांमध्ये शेतकरी चंद्रेशखर, गायिका सोमा घोष, प्रा. राजेश्वर आचार्य (Rajeshwar Acharya) आणि राजेंद्र प्रसाद चौरसिया (Rajendra Prasad Chaurasia) लोकांची नावे चर्चेत आहे. (Lok Sabha Election 2024)

चार नावांची निवड होणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नामांकनासाठी 18 प्रस्तावकांची अंतिम यादी तयार करून ती दिल्लीला पाठवण्यात आली आहे. यापैकी चार जणांची नावे आता दिल्लीतून निवडली जाणार आहेत. पंतप्रधानांच्या नामांकनावेळी हे लोक उपस्थित राहणार आहेत. सध्या प्रगतीशील शेतकरी चंद्रेशखर (Chandrasekhar), गायिका सोमा घोष (Singer Soma Ghosh), प्रा. राजेश्वर आचार्य (Prof. Rajeshwar Acharya) आणि राजेंद्र प्रसाद चौरसिया (Rajendra Prasad Chaurasia) यांच्या नावाची चर्चा आहे. (Lok Sabha Election 2024)

(हेही वाचा- India Power Shortage : जून महिन्यात भारतात जाणवणार १४ वर्षातील सगळ्यात मोठा वीज तुटवडा)

प्रस्तावकांची पहिली यादी 50 लोकांची

भाजपाने आठवडाभरापूर्वी ५० जणांची नावे फायनल करून वरिष्ठ नेतृत्वाशी चर्चा केली होती. त्यापैकी निम्म्याहून अधिक नावे कमी करण्यात आली. आता मंगळवारी १८ जणांची नावे निश्चित झाली असून ती यादी पाठवण्यात आली आहे. यामध्ये संगीतकार, पद्मश्री, पद्मभूषण, कृषी, व्यापारी आणि खलाशी यांच्याशी संबंधित नावांचा समावेश आहे. (Lok Sabha Election 2024)

अंतिम निवड हायकमांड करणार

या सर्व 18 जणांशी भाजपाच्या स्थानिक लोकांनी संपर्क साधला असून त्यांची नावे प्रस्तावकांच्या यादीत पाठवण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. अंतिम निवड दिल्लीतून होणार आहे. त्यांना 12 मे रोजी संध्याकाळपर्यंत कळवले जाईल आणि त्यांना 14 मे रोजी नामांकनासाठी हजर राहायचे आहे. (Lok Sabha Election 2024)

(हेही वाचा- Iran Released : भारताच्या परराष्ट्र धोरणाला यश, इस्रायलच्या जहाजातून ओलीस ठेवलेल्या ५ भारतीयांची केली सुटका)

नरेंद्र मोदींच्या 2014 आणि 2019च्या नामांकनादरम्यान जे प्रस्तावक होते त्यांची नावे परत घेतलेली नाहीत. प्रत्येकवेळी वेगवेगळे प्रस्तावक निवडले गेले. 2014 साठी प्रस्तावक म्हणून महामना मदन मोहन मालवीय यांचे नातू  गिरीधर मालवीय, शास्त्रीय गायक छन्नू लाल मिश्रा, नाविक भद्र प्रसाद निषाद आणि विणकर अशोक कुमार होते. (Lok Sabha Election 2024)

2019 मध्ये शास्त्रज्ञ होते प्रस्तावक

2019 च्या निवडणुकीत प्रस्तावकांमध्ये वैज्ञानिक रमाशंकर पटेल, मदन मोहन मालवीय यांची मानस कन्या अन्नपूर्णा शुक्ला, जगदीश चौधरी (डोमराजा) आणि पक्षाच्या सर्वात जुन्या कार्यकर्त्यांपैकी एक सुभाष गुप्ता यांचा समावेश होता. (Lok Sabha Election 2024)

(हेही वाचा- Sanju Samson Wicket : संजू सॅमसनच्या झेलाविषयी अधिक माहिती सांगणारा नवा व्हीडिओ समोर)

वाराणसीत 75 टक्के हिंदू

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी 2014 मध्ये आम आदमी पक्षाचे उमेदवार अरविंद केजरीवाल यांचा पराभव करून आणि 2019 मध्ये सपाच्या शालिनी यादव यांचा पराभव करून निवडणूक जिंकली होती. आता शालिनी यादव यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. मोदी यांना 2019 मध्ये 63.6 टक्के मते मिळाली होती आणि 2014 मध्ये 54.6 टक्के मते मिळाली होती. वाराणसी मतदारसंघात 75 टक्के हिंदू, 20 टक्के मुस्लिम आणि 5 टक्के इतर मतदार आहेत. येथील एकूण मतदारांपैकी सुमारे ६५ टक्के शहरी आणि ३५ टक्के ग्रामीण मतदार आहेत.  (Lok Sabha Election 2024)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.