IPL 2024 Play-Off Chances : उर्वरित साखळी सामन्यांतून कुणाला बाद फेरीची संधी?

IPL 2024 Play-Off Chances : आयपीएलमध्ये आता फक्त १३ साखळी सामने बाकी आहेत.

154
IPL 2024 Play-Off Chances : उर्वरित साखळी सामन्यांतून कुणाला बाद फेरीची संधी?
  • ऋजुता लुकतुके

आयपीएलच्या (IPL) सतराव्या हंगामात आता फक्त १३ साखळी सामने बाकी आहेत आणि पहिल्या चार संघांत स्थान मिळवून बाद फेरी गाठण्याची चुरस आता आणखी तीव्र होणार आहे. अशावेळी ‘प्रोबॅबिलिटी सिद्धांत’ वापरून कुठल्या संघाला बाद फेरीची किती शक्यता आहे याचा आढावा काही गणितज्ञांनी घेतला आणि त्यातून काय समोर आलंय ते पाहूया. उर्वरित १३ सामन्यातून बाद फेरीची तसंच गुणतालिकेतील क्रमवारीच्या एकूण ८,२०० शक्यता समोर येतात. त्यातील प्रत्येक शक्यतेची टक्केवारी काढून पहिल्या चार क्रमांकात तो संघ असण्याची शक्यात किती हे या गटाने काढलं आहे. बघूया कुणाला बाद फेरी गाठण्याची सर्वाधिक शक्यता आहे. (IPL 2024 Play-Off Chances)

कोलकाता नाईट रायडर्स –

कोलकाता संघाला गुणतालिकेत अव्वल स्थान राखण्याची शक्यता ३३ टक्के आहे. तर दुसऱ्या एखाद्या संघाबरोबर संयुक्तपणे अव्वल क्रमांक राखण्याची शक्यता ६२ टक्के आहे. विशेष म्हणजे गणित असं सांगतं की, उर्वरित चारही सामने त्यांनी गमावले तर कदाचित त्यांना बाद फेरीही गाठता येणार नाही. कारण, दिल्ली कॅपिटल्स बरोबर १६ गुणांवर ते बरोबरीत राहू शकतात आणि मग सरस धावगती चौथा क्रमांक ठरवेल. अर्थात, अशी शक्यता खूपच कमी म्हणजे ०.२ टक्के आहे. (IPL 2024 Play-Off Chances)

(हेही वाचा – India Power Shortage : जून महिन्यात भारतात जाणवणार १४ वर्षातील सगळ्यात मोठा वीज तुटवडा)

राजस्थान रॉयल्स –

राजस्थान आणि कोलकाता यांनी समसमान सामने आणि समसमान विजय मिळवले असल्यामुळे गुणतालिकेत अव्वल राहण्याची दोघांची शक्यता ३३ टक्के आणि संयुक्त अव्वल स्थानाची शक्यता ६२ टक्के आहे. तसंच राजस्थाननेही अजून बाद फेरी निश्चितपणे गाठलेली नाही. उर्वरित सामने गमावले तर दिल्ली आणि लखनौ बरोबर ते समसमान १६ गुणांवर राहू शकतात. पण, अशा परिस्थितीची शक्यता ०.४ टक्केच आहे. (IPL 2024 Play-Off Chances)

सनरायझर्स हैद्राबाद –

सनरायझर्स हैद्राबाद संघ सध्या तिसऱ्या स्थानावर आहे आणि बाद फेरी गाठण्याची त्यांची शक्यता ७२ टक्क्यांवरून ९४ टक्क्यांवर पोहोचली आहे. उर्वरित सामने जिंकून ते संयुक्तरित्या अव्वल स्थानही पटकावू शकतात. (IPL 2024 Play-Off Chances)

चेन्नई सुपर किंग्ज –

चेन्नई सुपर किंग्ज संघालाही पहिल्या चारात स्थान मिळवण्याची शक्यता ७२ टक्के इतकी आहे. पण, अव्वल स्थानावर ते पोहोचण्याची शक्यता मात्र निव्वळ ४ टक्के आहे. (IPL 2024 Play-Off Chances)

दिल्ली कॅपिटल्स –

दिल्ली संघ सध्या पाचव्या स्थानावर आहे. दिल्ली संघ इथून पुढे अव्वल स्थानावर तर पोहोचू शकत नाही. पण, बाद फेरी गाठण्याची शक्यता किंवा संयुक्त रित्या चौथं स्थान पटकावण्याची शक्यता ५० टक्के इतकी आहे. (IPL 2024 Play-Off Chances)

लखनौ सुपर जायंट्स –

बुधवारी झालेल्या दारुण पराभवानंतरही लखनौ संघ बाद फेरीत पोहोचू शकतो. पण, पहिल्या चारात पोहोचण्याची शक्यता मात्र आधीच्या ७० टक्क्यांवरून ५० टक्क्यांवर पोहोचली आहे. (IPL 2024 Play-Off Chances)

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू –

बंगळुरू संघ फार तर फार संयुक्तरित्या तिसऱ्या किंवा चौथ्या स्थानावर पोहोचू शकतो. पण, ती शक्यताही ८ टक्के इतकीच आहे. (IPL 2024 Play-Off Chances)

पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स या संघांचं आव्हान संपुष्टात आलं आहे. तर गुजरात टायटन्सकडेही बाद फेरी गाठण्याची संधी आठ टक्क्यांहूनही कमी आहे. (IPL 2024 Play-Off Chances)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.