Wonder Park Navi Mumbai: या उन्हाळ्यात जगातील सात आश्चर्ये पाहा एकाच ठिकाणी!

134
Wonder Park Navi Mumbai: या उन्हाळ्यात जगातील सात आश्चर्ये पाहा एकाच ठिकाणी!
Wonder Park Navi Mumbai: या उन्हाळ्यात जगातील सात आश्चर्ये पाहा एकाच ठिकाणी!

वंडर्स पार्क (Wonder Park Navi Mumbai) हे नेरुळ, नवी मुंबईतील लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या देखरेखीखाली हे उद्यान पर्यटकांना एकाच ठिकाणी जगातील आश्चर्ये पाहण्याचा अनोखा अनुभव देण्यासाठी डिझाइन केलेले आहे. नव्या रूपात सुरू झालेल्या लेझर शो व म्युझिकल फऊंटनची धमाल अनुभवायला मिळत असून लेझर शो, फाऊंटनमध्येच शिवछत्रपतींच्या गाण्यावर रंगीत पाण्यामध्येच विविध आकार पाहता येत आहेत. तसेच संगीताच्या तालावर नृत्याचा तालही धरता येत आहे. याच पार्कमध्ये २३ कोटी रुपये खर्चातून आकर्षक राईड्स बसवण्यात आल्या असून त्याचा आनंद घेण्यासाठी दर शनिवार रविवारी येथे गर्दी होते. (Wonder Park Navi Mumbai)

सध्या या पार्कमध्ये  (Wonder Park Navi Mumbai) असणारे निसर्ग सौंदर्य, सात जागितक आश्चर्यांच्या प्रतिकृती, इथली रचना, चारही बाजूंनी येणारा सूर्यप्रकाश या जमेच्या बाजू लक्षात घेऊन प्री वेडिंग शूट करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहेत. वंडर पार्कमधील ताजमहलाची प्रतिकृती, मिनी ट्रेन, बुद्धिबळाच्या खेळातील सोंगट्या, स्ट्रॉबेरी, तलाव, तलावावरील पूल, कारंजे, प्रशस्त उद्यान, झाडांची एक रांग या सर्व गोष्टी फोटो शूटसाठी महत्त्वाच्या ठरत आहेत. (Wonder Park Navi Mumbai)

नवी मुंबईतील वंडर पार्कला कसे जायचं?

वंडर्स पार्कसाठी  (Wonder Park Navi Mumbai) सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन हे नेरूळ रेल्वे स्थानक आहे. याशिवाय तुम्ही नेरूळ बस डेपोला बसने जाऊ शकतात. बस डेपोपासून पार्क 2 किमी अंतरावर आहे. तर, टॅक्सी किंवा स्वतःची कार चालवून पार्कमध्ये पोहोचू शकतात. हे उद्यान मुंबई-पुणे द्रुतगती मार्गापासून सुमारे 2 किमी अंतरावर आहे. उद्यान दररोज सकाळी 6 ते 12 आणि दुपारी 3 ते रात्री 9 या वेळेत खुले असते. (Wonder Park Navi Mumbai)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.