साल्व्हादोर दाली (Salvador Dali) यांचा जन्म ११ मे १९०४ साली कॅटालोनिया येथे स्पेनमधल्या फ्रेंच सीमेजवळच्या एम्पॉर्डा प्रदेशातल्या फिग्यूरेस शहरामध्ये झाला. त्यांचे वडील हे एक वकील होते. ते खूप कडक शिस्तीचे होते. त्यांच्या आईने आपल्या पतीच्या शिस्तीविरोधात जाऊन आपल्या मुलांच्या कलागुणांना प्रोत्साहन दिलं. दाली यांना चैनीची प्रचंड आवड होती. ते स्वतःला मूर्सचे वंशज मानायचे. दाली हे आपल्या देवाघरी गेलेल्या भावाच्या आठवणी आणि कल्पनांनी आयुष्यभर पछाडलेले होते. त्यांच्या कलाकृतींमध्ये पुष्कळदा त्यांच्या भावाची झलक दिसून यायची. (Salvador Dali)
साल्व्हादोर दाली (Salvador Dali) यांनी १९१६ साली फिग्यूरेस इथल्या म्युनिसिपल चित्रशाळेत चित्रकलेचं शिक्षण घेतलं. एकदा तत्कालीन कलाकार रॅमन पीचॉट यांच्या कुटुंबासोबत दाली हे उन्हाळी सुट्टी साजरी करायला गेले. तेव्हा त्यांना चित्रकलेतला एक वेगळा पैलू शिकायला मिळाला. त्यानुसार त्यांनी चित्रे काढायला सुरुवात केली. पुढच्याच वर्षी दाली यांच्या वडिलांनी त्यांच्या कोळशाच्या चित्रांचं प्रदर्शन आपल्या कुटुंबासाठी आयोजित केलं. दाली यांच्या चित्रांचं पहिलं सार्वजनिक प्रदर्शन १९१८ साली फिग्यूरेस येथे एका म्युनिसिपल थिएटरमध्ये भरवण्यात आलं होतं. (Salvador Dali)
(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : लोकसभा उमेदवारीतून सुटलेले नेते मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत)
दाली यांच्याकडे होते ‘हे’ कलागुण
ते १६ वर्षांचे असताना त्यांच्या आईचा गर्भाशयाच्या कर्करोगाने मृत्यू झाला होता. ही बाब दाली (Salvador Dali) यांच्यासाठी अतिशय धक्कादायक होती. पण ते हिंमत हरले नाहीत. त्यांची आई गेल्यानंतर त्यांच्या वडिलांनी तिच्या बहिणीशी लग्न केलं. त्यांनी या लग्नाला विरोध केला नाही, कारण दाली यांना आपल्या मावशी विषयी खूप आदर वाटायचा. (Salvador Dali)
दाली (Salvador Dali) यांच्या कलागुणांमध्ये चित्रकला, शिल्पकला, ग्राफिक डिझाईन्स, फिल्म्स, फोटोग्राफी यांचा समावेश होता. बऱ्याचदा त्यांनी इतर कलाकारांच्या साहाय्याने निबंध, कविता, आत्मचरित्र, कथा आणि टीकाही लिहिल्या आहेत. साल्व्हादोर दाली हे आपल्या कलागुणांव्यतिरिक्त आपल्या विचित्र वागण्याने नेहमीच चर्चेत राहायचे. त्यांच्या मिशाही अगदी विचित्र होत्या. आजही त्यांचा फोटो लावून मीम्स बनवले जातात, मात्र अनेकांना ते कोन आहेत हे माहित नसतं. त्यांचं जीवन आणि कार्य हे तत्कालीन नवोदित कलाकारांवर प्रभाव पाडत होतं. (Salvador Dali)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community