विचारपूर्वक बोला; Mallikarjun Kharge यांना निवडणूक आयोगाने फटकारले

निवडणूक आयोगाने काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना फटकारले आहे. आयोगाने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, खरगे मतदानाच्या आकडेवारीबाबत खोटे आरोप करत आहेत, त्यामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे.

171
विचारपूर्वक बोला; Mallikarjun Kharge यांना निवडणूक आयोगाने फटकारले

लोकसभेच्या (Lok Sabha Election 2024) तिसऱ्या टप्प्यातील मतदान (voting) पूर्ण झाले असून, आकडेवारी जाहीर करण्यासंदर्भात विलंब झाल्याचा आरोप काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनी (Mallikarjun Kharge) केला. खरगेंच्या या विधानावरून निवडणूक आयोयाने त्यांना ताकीद दिली असून, नागरिकांच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच खरगेंच्या विधानवरून मतदारांमद्धे नकारात्मकता निर्माण होऊ शकते. असे निवडणूक आयोगाने (Election Commission) म्हटले आहे.  (Mallikarjun Kharge)

(हेही वाचा – Uddhav Thackeray वोट जिहादचे आका; ॲड. Ashish Shelar यांचा घणाघात)

आयोगाने पुढे म्हटले आहे की, मतदानाची आकडेवारी जाहीर करण्यास कोणताही विलंब झालेला नाहीये. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी लोकसभेच्या मध्यावर असे बिनबुडाचे आरोप केल्याने जनतेच्या मनात संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे तसेच राज्याच्या निवडणूक प्रक्रियेत अडचणी निर्माण होऊ शकतात. असे निवडणूक आयोगाने विधान केले. 

(हेही वाचा- Hemant Soren यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा नाही, सोमवारी होणार पुढील सुनावणी )

खरगे यांनी इंडिया आघाडीतील पक्षांना लिहिले होते पत्र

मल्लिकार्जुन खरगे यांनी ७ मे रोजी इंडिया आघाडीतील (India Alliance) पक्षांच्या नेत्यांना पत्र लिहिले होते. खरगे म्हणाले होते की, यापूर्वी निवडणूक आयोग २४ तासांत किती टक्के मतदान झाले याची माहिती देत असे, मात्र यावेळी विलंब होत आहे, त्याचे कारण काय? याबाबत आयोगाने अद्याप स्पष्टीकरण का दिले नाही? विलंबानंतरही आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीत अनेक महत्त्वाची माहिती नाही. असे मुद्दे पत्रात नमूद केले होते.

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.