जर इस्रायलने (Israel) गाझापट्टीतील राफाह शहरावर सैनिकी कारवाई चालू ठेवली, तर अमेरिका त्यांना बाँब आणि अन्य दारुगोळा देणे थांबवेल, अशी चेतावणी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) यांनी इस्रायलला दिली होती. यावर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू (Benjamin Netanyahu) यांनी म्हटले आहे की, जर शस्त्रे संपली, तर इस्रायलचा प्रत्येक नागरिक शत्रूला स्वतःच्या नखांद्वारे ठार मारेल. इस्रायल पराभव पत्करणार नाही आणि एकटा उभा राहील.
(हेही वाचा – Mumbai South LS constituency : मुंबई-उपनगरातील वयस्कर मतदार सर्वाधिक दक्षिण मुंबईत)
आमची शक्ती एकतेमध्ये
नेतान्याहू पुढे म्हणाले की, आमची खरी शक्ती ही एकतेमध्ये आहे. आम्ही देवाच्या साहाय्याने जिंकू. इस्रायलच्या स्वातंत्र्यलढ्याच्या वेळी वर्ष १९४८ मध्ये आमच्याकडे शस्त्रे नव्हती. इस्रायलवर शस्त्रसंधीही होती; पण आत्मबळ, शौर्य आणि एकता यांच्या महान सामर्थ्याने आम्ही विजयी झालो.
आम्हाला कोणी रोखू शकत नाही
आमच्यात आणि अमेरिकेत अनेकदा करार झाले होते; पण आमच्यात मतभेदही होते. मला आशा आहे की, आपण त्यांच्यावर मात करू शकू; परंतु आमच्या देशाचे रक्षण करण्यासाठी आम्हाला जे करायचे आहे, ते आम्ही करू. कोणताही दबाव आम्हाला इस्रायलचा बचाव करण्यापासून रोखू शकत नाही, असे नेतान्याहू (Benjamin Netanyahu) म्हणाले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community