मुंबईत प्रत्येक वर्षी मालमत्ता कर वसुलीचे लक्ष्य ठेवले जात असले तरी प्रत्यक्षात त्याची वसुली होती नाही तसेच मोठ्या मालमत्ता कर थकबाकीदारांकडूनही वसुली होत नाही. या पार्श्वभूमीवर आता महापालिका आयुक्तांनी कर निर्धारण व संकलन विभागाच्या अधिकाऱ्यांना निर्देश देत मुंबईतील प्रत्येक मालमत्तांची तपासणी करून त्या जागेचा प्रत्यक्षातील वापर आणि त्यांचे क्षेत्रफळ यांची माहिती घेऊन नव्याने मालमत्ता कराची देयके तयार केली जावीत, असे सांगितले. तसेच मोठ्या मालमत्ता कर थकबाकीदारांकडून तात्काळ वसुली करतानाच ज्यांना नोटीस पाठवल्या आहेत, आणि त्यांच्या मालमत्तेची जप्ती अथवा अटकावणी केली आहे, त्यांच्या मालमत्तांचा लिलाव केला जावा अशाप्रकारचेही स्पष्ट निर्देश आयुक्तांनी दिले गेले आहेत. (Property Tax)
मुंबईतील नागरिकांना महानगरपालिकेद्वारे विविध नागरी सेवा-सुविधांच्या अनुषंगाने ‘मालमत्ता कर’ हा आकारला जातो. हा ‘मालमत्ता कर’ नागरिकांनी वेळेत महानगरपालिकेकडे जमा करावा, यासाठी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली करनिर्धारण व संकलन खात्यामार्फत सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. त्यासंदर्भात १० मे २०२४ महानगरपालिका मुख्यालयात बैठक पार पडली. त्यावेळी आयुक्त तथा प्रशासक गगराणी यांनी निर्देश दिले. अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, सहआयुक्त (करनिर्धारण व संकलन) सुनील धामणे, सहआयुक्त (महानगरपालिका आयुक्तांचे कार्यालय) चंद्रशेखर चोरे, सहायक आयुक्त (करनिर्धारण व संकलन) महेश पाटील यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. (Property Tax)
सन २०२३-२४ या आर्थिक वर्षाचा मालमत्ता करभरणा करण्याचा अंतिम दिनांक २५ मे २०२४ आहे. मालमत्ताधारकांनी अंतिम देय मुदतीपूर्वी करभरणा न केल्यास त्यांच्यावर कठोर दंडात्मक कार्यवाही करावी. वर्षोनुवर्ष कर थकीत ठेवणाऱ्या मोठ्या थकबाकीदारांना या पूर्वी जप्ती व अटकावणीची नोटीस दिलेल्या मालमत्तेवर महानगरपालिका तरतुदी अन्वये कलम २०५ नुसार जप्ती व अटकावणी करावी. मालमत्ताकराची वसूली न झाल्यास जप्त केलेल्या वस्तुंचा जाहीर लिलाव करण्याच्या प्रक्रियेस वेग द्यावा, त्यानंतर सदर मालमत्तेची जाहीर लिलावाद्वारे विक्री करण्याची कार्यवाही सुरू करावी, असे निर्देश महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिले. दरम्यान, करवाढीचा नवीन स्रोत शोधण्याकरीता २४ विभागातील मालमत्तांचे स्थळनिरीक्षण करून त्यातील बदलानुसार करनिर्धारणात सुधारणा करावी, असे निर्देश देखील आयुक्तांनी दिले आहेत. (Property Tax)
(हेही वाचा – Asaduddin Owaisi : छोटा भाऊ तोफ आहे; खासदार ओवैसींची हिंदूंना उघड धमकी)
आतापर्यंत ३,९० कोटींचा महसूल जमा
करनिर्धारण व संकलन विभागातर्फे आर्थिक वर्ष २०२३-२०२४ ची सुधारित मालमत्ता कर देयके फेब्रुवारी २०२४ अखेरीस निर्गमित झाल्यानंतर २५ मे २०२४ या अंतिम मुदतीपर्यंत कर भरण्याबाबत नागरिकांना सातत्याने आवाहन करण्यात येत आहे. करसंकलनाचे सन २०२३-२४ चे निर्धारित उद्दिष्ट ४ हजार ५०० कोटी रूपयांचे असून गुरूवार, ९ मे २०२४ अखेर ३ हजार ९०५ कोटी रूपयांचे कर संकलन झाले आहे. उर्वरित १५ दिवसात ५९५ कोटी रूपयांचा मालमत्ताकर संकलनाचे लक्ष्य आहे. त्यादृष्टीने बैठकीत सांगोपांग चर्चा करण्यात आली. नागरिकांनी मुदतीपूर्वी त्यांच्या मालमत्तासंबंधी कराचा भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे. (Property Tax)
मालमत्ता कर न भरणाऱ्या मालाड, वडाळा येथील तीन भूखंडावर जप्ती आणि अटकावणी
सातत्याने आवाहन करत आणि पाठपुरावा करुनही मालमत्ता करभरणा करण्यास टाळाटाळ करणाऱ्या तीन मालमत्ताधारकांवर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने जप्ती आणि अटकावणीची कारवाई करण्यात आली. या मालमत्तांमध्ये ‘पी उत्तर’ विभागातील २ भूखंड आणि ‘एफ उत्तर’ विभागातील एका भूखंडाचा समावेश आहे. या तीनही मालमत्ताधारकांकडे एकूण ०६ कोटी ७३ लाख २० हजार ९३१ हजार रुपयांची कर थकबाकी आहे. (Property Tax)
पुढील पाच दिवसांच्या आत करभरणा न केल्यास
पी उत्तर विभागात कुरार गावातील मालाड येथील एसजीएफ एंटरप्रायजेस (०३ कोटी ११ लाख ५८ हजार ९८९ रुपये), मालाड येथील राणी सती मार्ग येथील राधा कन्स्ट्रक्शन प्रा. लि. (०२ कोटी ५४ लाख ०५ हजार ७३७ रुपये) यांच्यावर कारवाई करण्यात आली. तर, एफ उत्तर विभागातील वडाळा येथील कपूर मोटर्स यांच्या व्यावसायिक भूखंडावर जप्ती आणि अटकावणीची कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडे एकूण ०१ कोटी ०७ लाख ५६ हजार २०५ रुपये मालमत्ता कर थकीत आहे. जप्ती आणि अटकावणीची कारवाई झालेल्या मालमत्ताधारकांनी पुढील पाच दिवसांच्या आत करभरणा न केल्यास जप्त केलेल्या मालमत्तेची लिलावाद्वारे विक्री करण्यात येईल. (Property Tax)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community