पुण्यातील विशेष यूएपीए न्यायालयाने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा निकाल शुक्रवार, १० मे रोजी दिला त्यात शरद कळसकर आणि सचिन अंधुरे या दोघांना जन्मठेप आणि पाच लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली. न्यायालयाच्या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेस नेते शरद पवार यांचे नातू, आमदार रोहित पवार यांनी समाज माध्यमावर टिप्पणी करीत ‘या प्रकरणातील ‘मास्टर माईंड’ हे मात्र नामानिराळे राहिले आहेत’ असे मत व्यक्त केले तर नेटकऱ्यांनी त्यांना चांगलेच धारेवर धरत अब्रू काढली. एकाने त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत होता याची आठवण करून दिली तर एकाने निर्दोष सुटलेल्यांना जितेंद्र आव्हाड यांच्या ताब्यात द्या, असा टोला लगावला. (Dabholkar Murder Case)
डॉ. दाभोळकर २० ऑगस्ट २०१३ रोजी मॉर्निंग वॉकसाठी निघाले असता महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावरून जात असताना दोघांनी दुचाकीवरून येऊन त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. (Dabholkar Murder Case)
पवारांची पोस्ट
आज शुक्रवारी यावर पुणे न्यायालयाने निकाल दिला. यावर रोहित पवार यांनी ‘X’ वर प्रतिक्रिया व्यक्त केली त्यात ते म्हणतात, “अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्या प्रकरणी शरद कळसकर आणि सचिन अंदुरे या दोन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावल्याबद्दल न्यायालयाचे आभार! परंतु काही आरोपी यातून निर्दोष सुटल्याने त्यांच्यावरील आरोप सिद्ध करण्यास सरकारला अपयश आलं, याचं दुःख होतं. यासोबतच आरोपींना शिक्षा होणं आवश्यक आहेच पण या प्रकरणातील ‘मास्टर माईंड’ हे मात्र नामानिराळे राहिले आहेत. त्यांच्या मुसक्या आवळून कायद्याने त्यांनाही शिक्षा होणं आवश्यक आहे.” (Dabholkar Murder Case)
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्या प्रकरणी शरद कळसकर आणि सचिन अंदुरे या दोन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावल्याबद्दल न्यायालयाचे आभार! परंतु काही आरोपी यातून निर्दोष सुटल्याने त्यांच्यावरील आरोप सिद्ध करण्यास सरकारला अपयश आलं, याचं दुःख होतं.… pic.twitter.com/VwKJ3N2RBr
— Rohit Pawar (@RRPSpeaks) May 10, 2024
(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : उमेदवारांसाठी रात्र थोडी, सोंगे फार)
सरकार नाही थेट न्यायालय म्हणा
पवार यांच्या या प्रतिक्रियेवर नेटकाऱ्यांनी उलटे त्यांनाच सुनावले. “१३ महिने तुमचेच तथाकथित सर्वोत्तम गृहमंत्री आराराबा आणि त्यांच्या पोलिसांनी तपासाचा यथेच्छ चुराडा केला. त्या हलगर्जीपणामुळेच आज आरोप सिद्ध करणे अवघड झाले होते,” असे एकाने सुनावले. तर एका नेटकऱ्याने “सरकार नाही थेट न्यायालय म्हणा, म्हणजे लोकांना स्पष्ट समजेल तरी की तूमचा संविधानावर कीती विश्वास आहे ते…” असा टोला लगावला. (Dabholkar Murder Case)
तुम्ही खूप हुशार अन प्रामाणिक
“निर्दोष सुटले यात दुःख कसलं? तुमच्यावर जेव्हा टॅक्स चोरीचा, मनी लाँड्रिंगचा आरोप होतो.. ED चौकशीला बोलावते.. तेव्हा तुम्ही स्वतःला १० वेळा निर्दोष सांगता… म्हणजे तुम्ही खूप हुशार अन प्रामाणिक अन ज्यांच्याविरुद्ध पुरावे नाही त्यांना दोषी ठरवायचं.. वा…” तसेच “निर्दोष सुटलेल्या आरोपींना आव्हाडच्या ताब्यात दे. आव्हाड यांच्याकडे स्वतंत्र समांतर अशी न्याय व्यवस्था आहे. असे प्रश्न ते चुटकी सरशी सोडवू शकतात. त्यांच्या रूपानं तुमच्या पक्षात एक हिरा आहे. हे तू पार विसरून गेला आहेस. त्यांना पटकन एक आदेश दे. कायदा गाढव आहे,” अशी प्रतिक्रिया लिहून पवारांना निरुत्तर केले. (Dabholkar Murder Case)
सगळं इथेच फेडाव लागतं
“कुठे फेडणार साहेब तुम्ही.. मुळात जेव्हा हत्या झाली तेव्हा सरकार कोणाचं. जर कोर्टात दोघांना. जन्मठेप झाली तर न्यायालयाचे आभार जे निर्दोष सुटले त्यांना तुम्ही आरोपी म्हणता म्हणजे न्यायालयाचा अवमान पुढे ते सुटले म्हणून सरकार दोषी. किती रे किती. एवढं लक्षात ठेवा सगळं इथेच फेडाव लागतं,” असेही एकाने सुनावले. (Dabholkar Murder Case)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community