Raj Thackrey मौलवींकडून जर महाविकास आघाडीला मतदान करण्याचे फतवे काढले जात असतील, तर मीसुध्दा फतवा काढतो, राज ठाकरे काय म्हणाले?

305
Raj Thackrey मौलवींकडून जर महाविकास आघाडीला मतदान करण्याचे फतवे काढले जात असतील, तर मीसुध्दा फतवा काढतो, राज ठाकरे काय म्हणाले?
Raj Thackrey मौलवींकडून जर महाविकास आघाडीला मतदान करण्याचे फतवे काढले जात असतील, तर मीसुध्दा फतवा काढतो, राज ठाकरे काय म्हणाले?
विशेष प्रतिनिधी, मुंबई

आजवरच्या सर्व लोकसभा निवडणुका या काही विषयांवर आणि मुद्यांवर झाल्या आहेत. परंतु या निवडणुकीत कोणताच विषय नाही. त्यामुळे जातीधर्माच्या नावावर भडकवले जात आहे. महाविकास आघाडीतील काँग्रेस, उबाठा शिवसेनेला मतदान करण्यासाठी मशिदींतून मौलवींकडून फतवे काढले जात आहेत, जर मशिदींतून अशाप्रकारे फतवे काढले जात असतील तर हा राज ठाकरे तमाम हिंदु भगिनी मातांना आवाहन करतोय की भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जे जे म्हणून उमेदवार आहेत त्यांना भरघोस मतदान करा, अशा शब्दांत जाहीर आवाहनच मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackrey) यांनी केले. या १८ व्या लोकसभेच्या निवडणुकीत मतदानात भाग घेऊन महायुतीच्या उमेदवारांना निवडून आणा, असेही ते म्हणाले.

महाराष्ट्र असा कधीच नव्हता

पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackrey)  यांची सभा झाली, या जाहीर सभेत बोलताना राज ठाकरे यांनी आजवर झालेल्या प्रत्येक निवडणुकीतील विषयांची जंत्रीच मांडली. ते म्हणाले, ही पहिली निवडणूक बघतो ज्याला विषयच नाही. विषय नसल्यामुळे प्रत्येकजण आईबहिणी काढतो, मी एकेकाची भाषणे ऐकतो, महाराष्ट्र असा कधी नव्हता, अशा गोष्टी बाहेरच्या राज्यात होत्या, असा शिवराळपणा कधीच भाषणात नव्हता, असे सांगत चिंता व्यक्त केली.

(हेही वाचा – Dabholkar Murder Case : रोहित पवारांची नेटकऱ्यांनी काढली अब्रू)

पुण्याला बरबाद व्हायला वेळ नाही लागणार

आपल्या नियोजनशुन्यतेमुळे शहरे बरबाद होतात, असे सांगताना त्यांनी आज आपल्या देशात नोकऱ्या नाहीत का? प्रत्येकांच्या टॅलेंटनुसार आहेत, शिक्षण मिळतेय, तरीपण आपल्याकडील मुले परदेशात का जातात? कारण सभोवतालचे वातावरण! आज सभोवतालचे वातावरण चांगले नाही. राजकीय मुद्दे त्यांना आवडत नाही, असल्या घाणेरड्या वातावरणात ते राहु इच्छित नाही म्हणून ते बाहेर जातात, असे त्यांनी सांगितले. मुंबई शहर बरबाद व्हायला एक काळ गेला, पण पुणे शहराची वाट लागायला वेळ नाही लागणार अशी भीती व्यक्त करत राज ठाकरे यांनी शहराला योग्य नियोजनाची गरज असल्याचे सांगितले.

मागील दहा वर्षांत ३० लाख लोक बाहेरुन आलेत

पुणे शहरातील लोकसंख्या ही ७० लाख एवढी आहे, मागील पाच ते दहा वर्षांपूर्वी ही लोकसंख्या ३० लाख एवढी होती. पण या ७० लाख लोकसंख्या असलेल्या शहरात ७२ लाख वाहने आहेत, मग या वाहनांना कुठून रस्ते मिळणार असा सवाल त्यांनी केला. पुणे शहरातील या लोकसंख्येनुसार शहरात १५ टक्के रस्त्यांची आवश्यकता आहे, पण सध्या केवळ ७ ते ८ टक्के आहेत. मागील दहा वर्षांत ३० लाख लोक बाहेरुन आलेत, मग शिक्षण असो व उद्योग नोकरीसाठी असतील.

(हेही वाचा – Mumbai South LS constituency : मुंबई-उपनगरातील वयस्कर मतदार सर्वाधिक दक्षिण मुंबईत)

मुस्लिम समाजाला काय गुरे ढोरे समजतात का?

यावेळी राज ठाकरे (Raj Thackrey)  यांनी मुस्लिमांची मते मिळवणसाठी मशिदींमधून मौलवीकडून फतवे काढत असल्याचा दाखला देत, आता काय तर मौलवींचे फतवे निघतात. काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान करावे, अनेक मुस्लिम सुन्नी आहेत. ते त्यांच्या वाटेलाही जाणार नाहीत. आता असे फतवे काढतात, मुस्लिम समाजाला काय गुरे ढोरे समजतात का? असा सवाल करत राज ठाकरे (Raj Thackrey)  यांनी जर मशिंदीमधून महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मतदान करण्याचे फतवे काढले जात असतील मीसुध्दा हिंदु भगिनी, मातांना आणि बांधवांनो, भाजपासह शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान करावे असे आवाहन राज ठाकरे (Raj Thackrey)  यांनी केले.

राम मंदिर होऊ शकले ते फक्त मोदी यांच्यामुळेच

मी चांगले आहे त्याचे अभिनंदन करणार आहे. जे वाह्यात आहेत, ज्यांना धार्मिक धुमाकुळ घालायचा आहेत ते काँग्रेसच्या माध्यमातून धुमाकुळ घालण्याचा प्रयत्न कर आहेत. उद्या जर त्यांच्या हाती सत्ता आली तर रस्त्यावरुन चालणेही कठिण होईल. याचा शेवट बाबरीचा ढाचा पाडला तेव्हाचा झाला. पण तो ढाचा पाडल्यानंतर राम मंदिर बनेल की नाही हाच प्रश्न होता. आमचे काही मतभेद असतील पण राम मंदिर होऊ शकले ते फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यामुळे, मंदिर बनल्याने शरयु नदीत फेकल्या गेलेल्या आणि गतप्राण झालेल्या कारसेवकांच्या आत्म्याला खऱ्या अर्थाने शांती लाभली असेल असेही ते म्हणाले.

(हेही वाचा – Open AI Search Engine : मायक्रोसॉफ्टचा पाठिंबा असलेली ओपन एआय कंपनी सोमवारी करणार सर्च इंजिनची घोषणा)

राज ठाकरेंचा मोहोळांना कानमंत्र

पुणे शहराची मांडणी आरोग्य, पाणी, रस्ते, पुल आदींच्या माध्यमातून नियोजनबध्द व्हायला हवी, शहरातील नागरिकांना सुखाने नांदता आले पाहिजे, घरातून सुखा समाधानाने बाहेर पडता यायला पाहिजे हे चित्र पार पाडण्याची जबाबदारी आपल्यावर असून या शहराला आपण आकार द्यावा असा कानमंत्र राज ठाकरे (Raj Thackrey)  यांनी भाजपाचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना दिला.

हेही पहा –

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.