Maharashtra Weather : राज्यात पुढचे ३ दिवस मुसळधार पावसाच्या सरी बरसणार!

255
Maharashtra Weather : राज्यात पुढचे ३ दिवस मुसळधार पावसाच्या सरी बरसणार!
Maharashtra Weather : राज्यात पुढचे ३ दिवस मुसळधार पावसाच्या सरी बरसणार!

राज्यात पुढील 3 दिवस बहुतांशी भागात वादळी वाऱ्यासह पावसाची (Maharashtra Weather) शक्यता (Unseasonal Rain In Maharastra) वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे उकाड्यापासुन नागरिकांना दिलासा मिळेल अशी आशा आहे. पुणे, सातारा, नांदेड, लातूर, चंद्रपूर, यवतमाळ या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट (Orange Alert) देण्यात आला आहे. आजपासून (११ मे) मंगळवारपर्यंत राज्यात वादळी पावसाची शक्यता असल्याचेही भारतीय हवामान विभागाने (IMD) सांगितलं आहे. (Maharashtra Weather)

(हेही वाचा –Raj Thackrey मौलवींकडून जर महाविकास आघाडीला मतदान करण्याचे फतवे काढले जात असतील, तर मीसुध्दा फतवा काढतो, राज ठाकरे काय म्हणाले?)

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, गारपीट आणि सोसाट्याचा वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. 40-50 किमी प्रतितास वाऱ्याचा वेग राहिल, अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. महाराष्ट्रासह बिहार, छत्तीसगड, राजस्थान, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि लक्षद्वीपमध्ये कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. (Maharashtra Weather)

(हेही वाचा –Raj Thackeray : अजित पवार यांच्या बद्दल राज ठाकरे असे काही म्हणाले, की…)

मुंबई, ठाणे आणि रायगडच्या अनेक भागात येत्या रविवारपासून पाऊस आणि वादळाची शक्यता देखील हवामान विभागाच्या अंदाजानुसार वर्तविण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यात पुढील दोन दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. दरम्यान, येत्या तीन दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वाऱ्यासह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. (Maharashtra Weather)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.