- ऋजुता लुकतुके
जेव्हा पाठ भिंतीला लागते तेव्हा एक निकराचं आक्रमण तो माणूस करतोच, असं युद्धात पाहायला मिळतं. आयपीएलच्या रनयुद्धात ती वेळ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्सवर आली आहे. त्यांची आव्हान वाचवण्याची निकराची लढाई सुरू आहे. शुक्रवारी गुजरात टायटन्सला चेन्नई विरुद्ध विजयही हवा होता. सरस धावगतीसाठी तो खूप मोठ्या फरकाने हवा होता. त्यापैकी पहिलं उद्दिष्टं त्यांनी साध्य केलं. चेन्नईवर ३५ धावांनी विजय मिळवत त्यांनी स्पर्धेत आव्हान कायम ठेवलं. पण, कर्णधार शुभमन गिल सामन्यानंतर म्हणाला त्याप्रमाणे त्यांना १५ ते ३० धावा कमी पडल्या. (IPL 2024, GT VS CSK)
(हेही वाचा- Mobile Handsets : देशातील 28 हजार 200 मोबाईल हँडसेट ब्लॉक होणार; काय आहे कारण ?)
शुभमन गिल (Shubman Gill) आणि साई सुदर्शन (Sai Sudarshan) हे सलामीवीर ज्या पद्धतीने खेळत होते त्यांना बाद फेरीची स्पर्धा किती निकराची झालीय हे नक्की कळत होतं. त्यांच्या प्रयत्नांना यश आलं. १७ षटकांत २१० धावांची सलामी दोघांनी दिली. यात सुदर्शनचा वाटा ५१ चेंडूंत १०३ धावांचा. तर शुभमनचा वाटा ५५ चेंडूंत १०४ धावांचा. दोघांनी मिळून १३ षटकारांची आतषबाजी केली. दोघं एकामागून एक बाद झाल्यामुळे शेवटच्या तीन षटकांत गुजरातच्या धावांचा वेग काहीसा मंदावला. तीच गोष्ट त्यांना धावगतीच्या बाबतीत त्रास देणारी ठरलीय. पण, फलकावर ३ बाद २३१ धावा उभ्या राहिल्या. विजयासाठी त्या पुरेशाही ठरल्या. (IPL 2024, GT VS CSK)
For his excellent 💯 and leading from the front, Shubman Gill wins the Player of the Match Award 🏆
Scorecard ▶️ https://t.co/PBZfdYswwj#TATAIPL | #GTvCSK pic.twitter.com/DI3iPp8awE
— IndianPremierLeague (@IPL) May 10, 2024
उर्वरित काम गुजरातसाठी गोलंदाजांनी पूर्ण केलं. कारण, २३२ धावांचं लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या चेन्नईचे पहिले तीन गडी १० धावांतच तंबूत परतले. अजिंक्य आणि रचिन रवींद्र प्रत्येकी १ तर ऋतुराज गायकवाड (Rituraj Gaikwad) शून्यावर बाद झाले. डेरिल मिचेल आणि मोईन अली यांनी चेन्नईचा डाव सावरला. दोघांनी १०९ धावांची भागिदारी करत चेन्नईला विजयाची संधीही निर्माण केली होती. मिचेलने ६३ तर मोईन अलीने ५६ धावा केल्या. पण, त्यानंतर शिवन दुबे (२१), रवींद्र जाडेजा (१८) आणि धोनी नाबाद २६ हे आवश्यक धावगती राखू शकले नाहीत. त्यामुळेच दडपण वाढत गेलं. आणि अखेर चेन्नईचा पराभव झाला. (IPL 2024, VS BT CSK)
(हेही वाचा- Lok Sabha Election 2024 : मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत – हिर्देश कुमार)
चेन्नईचे १२ सामन्यांतून १२ गुण झाले आहेत. सध्या गुण तालिकेत ते चौथ्या क्रमांकावर आहेत. तर गुजरात टायटन्सना बाद फेरीची थोडीशी धुगधुगी असली तरी आठव्या क्रमांकावर असल्यामुळे तशी शक्यता खूपच कमी आहे. (IPL 2024, GT VS CSK)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community