Indian Team’s Head Coach : बीसीसीआय मुख्य प्रशिक्षक नेमण्यासाठी निविदा मागवणार, राहुल द्रविडला करावा लागेल पुन्हा अर्ज 

Indian Team’s Head Coach : आताचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा कार्यकाल जूनमध्ये संपत आहे 

127
Indian Team’s Head Coach : बीसीसीआय मुख्य प्रशिक्षक नेमण्यासाठी निविदा मागवणार, राहुल द्रविडला करावा लागेल पुन्हा अर्ज 
Indian Team’s Head Coach : बीसीसीआय मुख्य प्रशिक्षक नेमण्यासाठी निविदा मागवणार, राहुल द्रविडला करावा लागेल पुन्हा अर्ज 
  • ऋजुता लुकतुके

भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य (Indian Team’s Head Coach) प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांचा कार्यकाळ टी-२० विश्वचषकानंतर (T20 World Cup) संपत आहे. त्यानंतर प्रशिक्षक पदासाठी अर्ज मागवणार असल्याचं बीसीसीआयचे (BCCI) सचिव जय शाह (Jai Shah) यांनी स्पष्ट केलं आहे. ‘आम्ही येत्या काही दिवसांतच मुख्य प्रशिक्षक पदासाठी नवीन अर्ज मागवणार आहोत. राहुल द्रविड (Rahul Dravid) यांची मुदत जूनमध्ये संपतेय. आणि त्यांनाही मुदत वाढवायची असेल तर पुन्हा अर्ज करावा लागेल. कारण, यावेळी आम्ही दीर्घ मुदतीसाठी प्रशिक्षक नेमणार आहोत, किमान ३ वर्षांसाठी. त्यामुळे ही सगळी प्रक्रिया पार पाडावी लागेल,’ असं जय शाह (Jai Shah) मुंबईत बीसीसीआयच्या कार्यालयात पत्रकारांशी बोलताना म्हणाले. (Indian Team’s Head Coach)

(हेही वाचा- Accident In Up: लग्नाची वरात घेऊन जाणाऱ्या दोन वाहनांनी घेतला पेट, वरासह ४ जणांचा मृत्यू)

२०१९ मध्ये राहुल द्रविड (Rahul Dravid) भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक झाले Indian Team’s Head Coach(). सुरुवातीला त्यांचा करार हा एकदिवसीय विश्वचषकापर्यंत होता. नोव्हेंबर २०२३ मध्ये तो संपल्यानंतर सहा महिन्यांनी हा करार वाढवण्यात आला. आता नवीन करार हा किमान तीन वर्षांसाठी असेल. एकदा मुख्य प्रशिक्षकाची निवड झाल्यानंतर त्यांच्या सहमतीने त्यांचे सहाय्यक प्रशिक्षकही निवडण्यात येतील. प्रशिक्षक परदेशी असावा की नसावा याचा निर्णय क्रिकेट समिती घेईल, असंही जय शाह (Jai Shah) यांनी स्पष्ट केलं.  (Indian Team’s Head Coach)

‘क्रिकेट समितीला जर परदेशी प्रशिक्षक आवश्यक वाटला, तर आम्ही कुणीही त्यात ढवळाढवळ करणार नाही. तो निर्णय पूर्णपणे समितीचा असेल. शिवाय शक्यतो सर्व फॉरमॅटसाठी एकच प्रशिक्षक असावा असा आमचा प्रयत्न असेल. पण, समितीवर तसं बंधन नाही. हा निर्णयही ते घेऊ शकतात,’ असं शाह यांनी सांगितलं. (Indian Team’s Head Coach)

(हेही वाचा- ISRO: इस्रोला अंतराळ संशोधनात मोठे यश, ३-डी प्रिटेंड द्रव रॉकेट इंजिनची उड्डाण चाचणी यशस्वी)

मुख्य प्रशिक्षकाबरोबरच निवड समितीतील एक जागा रिक्त आहे ती ही लवकरच भरण्यात येईल, असं शाह यांनी सांगितलं आहे. या जागेसाठी काही मुलाखती झाल्याचंही ते म्हणाले. आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया इथं सातत्याने होत आहे. ती जागा बदलण्याच्या दृष्टीने आयसीसीशी चर्चा सुरू असल्याचं शाह म्हणाले. (Indian Team’s Head Coach)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.