BCCI Contracts : श्रेयस आणि इशान यांचे करार कुणी रद्द केले, जय शाह यांनी काय सांगितलं?

BCCI Contracts : रणजी खेळण्याचे निर्देश धुडकावल्यानंतर बीसीसीआयने या दोन क्रिकेटपटूंना करारातून काढून टाकलं आहे 

168
BCCI Contracts : श्रेयस आणि इशान यांचे करार कुणी रद्द केले, जय शाह यांनी काय सांगितलं?
BCCI Contracts : श्रेयस आणि इशान यांचे करार कुणी रद्द केले, जय शाह यांनी काय सांगितलं?
  • ऋजुता लुकतुके

श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) आणि इशान किशन (Ishan Kishan) यांचे बीसीसीआयबरोबरचे (BCCI Contracts) मध्यवर्ती करार न वाढवण्याचा निर्णय सर्वस्वी निवड समिती प्रमुख अजित आगरकर (Ajit Agarkar) यांचा होता, असं बीसीसीआयचे सचिव जय शाह (Jai Shah) यांनी शुक्रवारी स्पष्ट केलं. याविषयी बोलताना एक गंभीर इशाराही दिला, ‘कुणीही संघापेक्षा मोठं नसतं.’ बीसीसीआयने या दोघांनाही देशांतर्गत क्रिकेट खेळण्याचा सल्ला दिला होता. पण, दोघांनीही तो पाळला नाही. रणजी करंडक सुरू असताना इशान किशन (Ishan Kishan) आपल्या आयपीएल फ्रँचाईजीच्या सराव केंद्रात सराव करत होता. अखेर या दोघांनाही बीसीसीआयने करारातून वगळलं. (BCCI Contracts)

(हेही वाचा- Security Forces: छत्तीसगडमध्ये १२ नक्षलवादी ठार; तीन जिल्ह्यांतील १२०० जवानांची संयुक्त कारवाई)

‘माझं काम बैठक बोलावणं आणि ती पार पाडणं इतकंच आहे. मी निर्णय घेत नाही. ते निवड समिती करते. पण, आपली जागा कुणी घेऊ शकत नाही, असं कुठल्याही खेळाडूने समजू नये. या दोघांसाठी चांगले पर्याय आपल्याकडे आहेत,’ असं जय शाह पत्रकारांशी बोलताना म्हणाले. (BCCI Contracts)

श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) पाठीच्या दुखापतीमुळे मुंबईसाठी दोन रणजी सामने खेळला नव्हता. पण, कोलकाता संघाने मुंबईतच आयोजित केलेल्या एका शिबिराला त्याने हजेरी लावली. तर इशान किशन (Ishan Kishan) अख्खा हंगाम खेळला नाही. तो बडोद्यात मुंबई इंडियन्सच्या केंद्रात सराव करत होता. इंग्लंड विरुद्धची कसोटी मालिका सुरू असतानाच जय शाह (Jai Shah) यांनी पहिल्यांदा मीडियात अशा खेळाडूंविरुद्ध कारवाई करण्याचे संकेत दिले होते. आताही त्यांनी बीसीसीआयची (BCCI Contracts) भूमिका स्पष्ट केली. ‘देशांतर्गत क्रिकेटमध्ये जो सातत्यपूर्ण कामगिरी करेल, त्याचाच राष्ट्रीय संघात विचार होईल. हार्दिकनेही दुखापतीतून सावरल्यावर विजय हजारे चषक खेळण्याची तयारी दाखवली होती. पण, त्याला सामन्यासाठी पूर्ण तंदुरुस्त होण्यासाठी विश्रांती आवश्यक होती. म्हणून त्याला बडोद्यात सराव करण्याची परवानगी देण्यात आली. करारातून वगळलेल्या खेळाडूंशीही मी बोललो आहे. त्यांना परिस्थिती समजावून सांगितली आहे,’ असं शाह म्हणाले.  (BCCI Contracts)

(हेही वाचा- Narhari Zirwal: झिरवळ अजितदादांसोबतच! ‘त्या’ व्हायरल फोटोमागचं सत्य आलं समोर)

आयपीएल दरम्यानही जय शाह (Jai Shah) इशान किशन (Ishan Kishan) आणि श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) यांच्याशी बोलताना टीव्ही कॅमेरांनी टिपलं आहे. (BCCI Contracts)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.