छत्तीसगडमधील विजापूर जिल्ह्यात सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांविरोधात मोठी मोहीम सुरू केली आहे. सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. डीआरजी, सीआरपीएफ, कोब्रा, एसटीएफ, बस्तर फायटर्स आणि बस्तर बटालियनचे शेकडो जवानांचा या मोहिमेत समावेश आहे. गंगालूर पोलीस स्टेशन परिसरातील पेडिया जंगलात ही चकमक सुरू असल्याचे सांगितले जात आहे. (Security Forces)
विजापूरचे पोलीस अधीक्षक जितेंद्र यादव यांनी सांगितले की, दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू आहे. असे सांगितले जात आहे की गुरुवारी, (९ मे)च्या रात्री सुरक्षा दलांना माहिती मिळाली की, मोठे नक्षलवादी पीडिया येथील विजापूर या शेवटच्या गावात लपलेले आहेत. या चकमकीत आतापर्यंत १२ नक्षलवादी मारले गेले आहेत.
(हेही वाचा – Indian Team’s Head Coach : बीसीसीआय मुख्य प्रशिक्षक नेमण्यासाठी निविदा मागवणार, राहुल द्रविडला करावा लागेल पुन्हा अर्ज )
मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
संपूर्ण वनक्षेत्रात एसटीएफ, डीआरजी आणि सीआरपीएफच्या कोब्रा बटालियनसह १२०० हून अधिक जवानांनी परिसराला वेढा घातला आहे. तपास अद्याप सुरू असल्याने पोलिसांनी सध्या अधिक तपशील उघड केलेला नाही. सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. अनेक नक्षलवादी मारले गेल्याचे मानले जाते, परंतु अद्याप याबाबत अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
मुख्यमंत्र्यांचा नक्षलवाद्यांना शरण येण्याचा इशारा
छत्तीसगडचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री विष्णूदेव साई यांनी नक्षलवाद्यांना शरण येण्याचा इशारा दिला होता, नाहीतर त्यांचा नायनाट केला जाईल. मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यानंतर आता सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांच्या मोठ्या कमांडरला लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. सुरक्षा दल विजापूर आणि दंतेवाडाच्या जंगलात शोध घेत आहेत. त्यासोबत त्यांनी सतर्कतेचा इशारादेखील सक्रीय केला आहे. नुकत्याच झालेल्या चकमकीत अनेक नक्षलवादी मारले गेले आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community