राज्य शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या मुख्य परीक्षेच्या निकालांच्या वेगवेगळ्या तारखा सोशल मिडियावरून फिरत आहेत. त्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे शिवाय संभ्रमही निर्माण होत आहे. मुंबई, पुण्यासह राज्यातील ९ विभागीय मंडळांत निकालासंदर्भात वारंवार विचारणा केली जात आहे. यामुळे विद्यार्थी संबंधित शाळा आणि विभागीय मंडळाकडे चौकशी करत आहेत. (Maharashtra Board Result 2024)
दहावीचा निकाल हा १० मे रोजी, तर काही ठिकाणी दहावी-बारावीचा निकाल २० ते ३० मेदरम्यान जाहीर केला जाणार असल्याची माहिती सोशल मीडिया आणि संकेतस्थळावरून दिली जात आहे. यामुळे पालकांकडून सतत होणाऱ्या चौकशीमुळे शिक्षण मंडळाच्या कामकाजावर परिणाम होत आहे, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. राज्य शिक्षण मंडळाच्या कामकाजावर परिणाम होत आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. (Maharashtra Board Result 2024)
(हेही वाचा –Security Forces: छत्तीसगडमध्ये १२ नक्षलवादी ठार; तीन जिल्ह्यांतील १२०० जवानांची संयुक्त कारवाई )
शिक्षण मंडळाचे आवाहन
निकालाच्या तारखा अद्याप जाहीर झाल्या नसून, राज्य शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात आणि दहावीचा अखेरच्या आठवड्यात लावण्याचे मंडळाचे प्रयत्न आहेत. यामुळे पालक, विद्यार्थी आणि शाळांनी निकालाच्या तारखांसंदर्भात सोशल मीडियावर विश्वास ठेवू नये. संकेतस्थळावरील जाहीर केलेली निकालाची तारीख अधिकृत असेल, असे आवाहन शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी केले आहे.
हेही पहा –