Neeraj Chopra : दोहा डायमंड लीगमध्ये ८८.३६ मीटरच्या फेरीसह नीरज दुसरा 

Neeraj Chopra : नीरजचं सुवर्ण दोन सेंटीमीटरनी हुकलं

137
Neeraj Chopra : दोहा डायमंड लीगमध्ये ८८.३६ मीटरच्या फेरीसह नीरज दुसरा 
Neeraj Chopra : दोहा डायमंड लीगमध्ये ८८.३६ मीटरच्या फेरीसह नीरज दुसरा 
  • Jऋजुता लुकतुके

भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने (Neeraj Chopra) ऑलिम्पिक हंगामाची सुरुवात रौप्य पदकाने केली आहे. दोहा इथं झालेल्या डायमंड्स लीग स्पर्धेत (Diamonds League Tournament) नीरज ८८.३६ मीटरच्या फेकीसह दुसरा आला. पहिल्या आलेल्या याकुब वादवेहची फेक नीरजपेक्षा दोन सेंटीमीटर जास्त होती. गेल्यावर्षी नीरजने (Neeraj Chopra) ही स्पर्धा जिंकली होती. यंदा तिसऱ्या फेकीतच याकुबने ८८.३८ मीटरचा पल्ला गाठला होता. शेवटच्या पाचव्या फेकीत नीरजने त्याच्या पुढे जाण्याचा निकराचा प्रयत्न केला. पण, ती फेकही दोन सेंटीमीटरने कमीच पडली. (Neeraj Chopra)

(हेही वाचा- Navneet Rana: ओवेसींच्या आव्हानाला मी मोजत नाही, नवनीत राणांचं ओवेसींना पुन्हा चॅलेंज!)

दोनवेळा विश्वविजेता ठरलेला अँडरसन पीटर्स ८६.६२ मीटरच्या फेकीसह तिसरा आला. नीरजचा (Neeraj Chopra) साथीदार किशोर जाना (Kishore Jana) मात्र डायमंड्स लीगच्या पदार्पणात सपशेल अपयशी ठरला. तीन प्रयत्नांत तो ७६.३१ मीटरच्या वर जाऊ शकला नाही. त्यामुळे प्राथमिक फेरीत त्याला बाद व्हावं लागलं. किशोरची वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी ८७.५४ मीटरची आहे. त्या जीवावर गेल्याच वर्षी त्याने होआंगझाओ इथं आशियाई क्रीडास्पर्धेत (Asian sports) रौप्य जिंकलं होतं. पण, पहिली डायमंड्स लीग खेळताना तो गोंधळून गेला.  (Neeraj Chopra)

नीरजने मात्र ऑलिम्पिक हंगामाची सुरुवात आश्वासक केली आहे.

नीरज चोप्रा (Neeraj Chopra) ऑलिम्पिक (Olympics) हंगामात आपली पहिलीच स्पर्धा खेळत होता. सुरुवातीला त्याला अचूक फेक करण्यात अडचणही आली. पहिली फेक फाऊल होती. पण, पुढे प्रत्येक फेकीत त्याची कामगिरी उंचावत गेली. शेवटच्या फेकीत त्याने साधलेली ८८.३६ मीटरचं अंतर ही त्याची कारकीर्दीतील आठवी सर्वोच्च फेक होती. या स्पर्धेनंतर आता नीरज कॉन्फेडरेशन चषक खेळण्यासाठी भारतात परतणार आहे.  (Neeraj Chopra)

(हेही वाचा- Maharashtra Board Result 2024: सोशल मीडियावरील ‘या’ अफवांवर विश्वास ठेवू नका, शिक्षण मंडळाचे आवाहन)

यावेळी सुवर्ण जिंकलेला याकुब वाजदेह टोकयो ऑलिम्पिकमध्ये दुसरा तर विश्वअजिंक्यपद स्पर्धेत तिसरा आला होता. या हंगामात अजूनही कुणी ९० मीटरचा टप्पा गाठलेला नाही. (Neeraj Chopra)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.