Swine Flu, Dengue: साथीच्या रुग्णांची माहिती लपवून ठेवणाऱ्या रुग्णालयांवर गुन्हा दाखल होणार, नेमका काय आहे कायदा? जाणून घ्या…

186
Swine Flu, Dengue: साथीच्या रुग्णांची माहिती लपवून ठेवणाऱ्या रुग्णालयांवर गुन्हा दाखल होणार, नेमका काय आहे कायदा? जाणून घ्या...
Swine Flu, Dengue: साथीच्या रुग्णांची माहिती लपवून ठेवणाऱ्या रुग्णालयांवर गुन्हा दाखल होणार, नेमका काय आहे कायदा? जाणून घ्या...

स्वाईन फ्लू, डेंग्यूसारख्या साथरुग्णांची माहिती लपवून ठेवणाऱ्या खासगी रुग्णांलयावर साथरोग प्रतिबंधक कायदा १८९७अंतर्गत भारतीय दंड संहितेच्या कलम१८८ नुसार गुन्हा दाखल करण्याचा इशारा महापालिकेचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. तानाजी चव्हाण यांनी दिला आहे. बदलत्या वातावरणामुळे साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव वाढला आहे. अशा वेळी खासगी रुग्णालयांकडून दाखल झालेल्या रुग्णांची माहिती नाशिक महापालिकेला कळविली जात नसल्यामुळे प्रशासनाने हा पवित्रा घेतला आहे. (Swine Flu, Dengue)

शहरात जानेवारी ते एप्रिल या ४ महिन्यांत स्वाईन फ्लूचे २३ बाधित रुग्ण आढळले. ग्रामीण भागातही १८ रुग्णांची नोंद झाली आहे. स्वाईन फ्लूमुळे गेल्या महिनाभरातच ६ जणांचा बळी गेला आहे. त्यात नाशिक शहरातील एका डॉक्टरचा तर, ग्रामीण भागातील ५ रुग्णांचा समावेश आहे. नाशिक शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये या सर्व रुग्णांवर उपचार सुरू होते. स्वाईन फ्लू, डेंग्यू सारख्या साथ रोगांच्या आजारांची लागण झालेले रुग्ण दाखल झाल्यानंतर त्यासंदर्भातील माहिती महापालिकेच्या वैद्यकीय विभागाला कळविणे महापालिका हद्दीतील खासगी रुग्णालयांवर बंधनकारक आहे. यासंदर्भात वैद्यकीय विभागाने शहरातील सर्व ६५० रुग्णालयांना एप्रिलमध्ये सूचनापत्र देत साथरुग्णांची माहिती कळविण्याबाबत सूचित केले होते, मात्र त्यानंतरही खासगी रुग्णालयांकडून फारसा प्रतिसाद मिळत नसल्यामुळे अखेर महापालिकेने कठोर भूमिका घेतली आहे. स्वाईन फ्लू, डेंग्यूसारख्या साथरोगाची लागण झालेल्या रुग्णाची माहिती दडविल्याचे निदर्शनास आल्यास अशा खासगी रुग्णालयांविरोधात थेट गुन्हा दाखल केला जाणार आहे.

(हेही वाचा – Neeraj Chopra : दोहा डायमंड लीगमध्ये ८८.३६ मीटरच्या फेरीसह नीरज दुसरा )

नेमका कायदा काय?
साथरोग प्रतिबंधक कायदा १८९७ अंतर्गत भारतीय दंड संहितेच्या कलम १८८नुसार साथरोगाची माहिती लपविण्याचा प्रयत्न झाल्यास थेट गुन्हा दाखल करण्याची तरतूद आहे. यासंदर्भात महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए), नॅशनल इंटिग्रेटेडे मेडिकल असोसिएशन (निमा), प्रायव्हेट मेडिकल असोसिएशन (पीएमए), फॅमिली प्रॅक्टिशनर असोसिएशन (एफपीए), सातपूर-अंबड डॉक्टर्स असोसिएशन (एसएडीए), जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशन (जीपीए) या संघटनांना पत्राद्वारे सुचित केले आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.